
छत्रपती प्रतिष्ठान व ज्ञानदा प्रकाशनमार्फत वाडा येथील पी. जे हायस्कुलमध्ये आयोजित कार्यक्रमात सामना वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी सचिन जगताप यांना स्व. राम बा. पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरवर्षी शिव जयंती निमित्त छत्रपती प्रतिष्ठान व ज्ञानदा प्रकाशनमार्फत वाडा तालुक्यात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनिय काम केलेल्या मान्यवरांना गौरविण्यात येते. यंदाही पाच ते सहा जणांना गौरविले गेले. त्यात पत्रकार सचिन जगताप यांचाही समावेश होता. विशेषतः या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. प्रतिष्ठानचे युवराज ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी सचिन जगताप यांचा शाल, श्रीफळ मानचिन्ह व मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान केला. जगताप यांना मिळालेली बक्षिसी रोख रक्कम त्यांनी संजीवन प्रबोधिनी या सामाजिक संस्थेला देणगी स्वरूपात यावेळी दिली.