आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना बस प्रवासात 50 टक्के आरक्षण ठेवले, याचे मी महिला व समाजसेविका या नात्याने सरकारच्या निर्णयाचे स्वागत करते.
एकविसाव्या शतकात महिला स्वावलंबी बनत आहेत पण कुठेतरी नोकरी करत असताना प्रवास भाडे इतके जास्ती होतात की त्यामुळे खूप वेळा त्यांना मुलांनाही घरी ठेवावे लागते आणि कामात जावे लागते अशावेळी सरकारने आजच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दिलेला निर्णय हा खूप सुखद धक्का आहे सामान्यांसाठी.
महिला वर्गांना सक्षमीकरण करणे हा सरकारचा खूप छान हेतू आहे त्याला जोड म्हणून आज सरकारने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे की महिलांना बस प्रवासामध्ये 50 टक्के आरक्षण मिळत आहे 50 टक्के सूट दिली जात आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या महिलांना आणि इतर घर कामासाठी निघणाऱ्या सर्व महिलांना बस प्रवासात दिलेल्या 50 टक्के सूट सारखेच जर लोकल प्रवासाच्या साठी पण 50 टक्के सूट मिळाली तर महिलांसाठी ही खूप छान संधी असेल स्वावलंबी होताना पैसे वाचवण्याची .
यानिमित्ताने सरकारकडे सरकारकडे हेच मागणी आहे की बस प्रवासात दिलेल्या आरक्षणासारखे महिलांना ट्रेन म्हणजे लोकल प्रवासातही 50% सूट देण्यात यावी. ही मागणी आहे.

स्नेहा जावळे समाजसेविका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *