
वसई, तहेसीन चिंचोलकर: नुकतेच नालासोपारा येथील स्त्री दर्पण मासिकाच्या माध्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून 100 वूमन अफ वर्ल्ड मध्ये सम्मानीत नायगाव येथील कर्मवीर स्नेहा जावळे, डॉ. रचना ताडे, नीता शिरसाट (व.वि.श मनपा), महिला उद्योजिका साक्षी सतीश बोर्डे (आर.बी.डेव्हलपर्स), पत्रकार राजेश जाधव, हजर होते. तसेच इतर महिला वर्गात शिवसेना पक्षाचे सोनल श्याम ठाकूर, उपसंपादक पूर्णिमा मिश्रा, सामाजिक कार्यकर्ता रजनी गडा, सीमा (शशीकला ) यादव, समन्वयक अनिता सातपुते, संगीता साले,आरोग्य विभागाचे सुजाता गायकवाड, अर्चना गायकवाड,सामाजिक कार्यकर्ता प्रणाली कासले, सोनल महाडिक, राखी राजू लोखंडे, अनिता वैद्य, सामाजिक कार्यकर्ता ज्योती असगांवकर अशा महिलांनी सहभाग घेतला. मुलांसह कार्यक्रमात पुरुष विजय गोडबोले, वंचित आघाडीचे राजू लोखंडे, रिपाई चे प्रदेश सदस्य सतीश बोर्डे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गडा यांनीही आवर्जून हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्री बाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली. प्रज्योत मोरे पत्रकार यांच्या पत्नी यांना दोन मिनिटाचे मौन धरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आपले मत व्यक्त करताना स्त्री दर्पणच्या संपादिका तेहसीन चिंचोलकर नारी शक्ती ही एक निर्भीड अस्तित्व आहे व ती स्वतः ची ओळख देण्यासाठी तिला कोणाची गरज नाही असे मला वाटते येणाऱ्या काळात महिलांनी सदृढ व्हाव्हे अशी अशा व्यक्तवून महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना स्त्री दर्पण ट्रॉफी देऊन सम्मानीत करण्यात आले, मानपात्र महिलांना सम्मानपत्र देऊन मान देण्यात आला. इतर महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांना स्त्री दर्पणच्या माध्यमातून अनेक बक्षीस देऊन सम्मान देण्यात आले.
कार्यक्रमाची संयोजक टीम विशाल धोत्रे, हिम्मत परमार, बैजू, कु. उमर चिंचोलकर व कोआरर्डीनेटर- अनित सातपुते यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यकमाचे सूत्र संचालन राजेश जाधव यांनी केले कार्यक्रमांची शोभा राजू लोखंडे यांनी सुंदर गायनाने वाढवली, कार्यक्रमाची सांगता सर्वांचे मन ठेवून राष्ट्रगीत वर संपवले.