पालघर जिल्हाध्यक्ष – परेश घाटाळ

गाव चिंचोटी लोहारपाडा येथील जमीन सर्वे नंबर ४९, ५०, ५१ या जमिनीवर भुमाफिया राजेंद्र यादव, हरिशंकर यादव, जयहिंद यादव शरीफ रुस्तम अंसारी व यांचे इतर साथीदार अनधिकृत चाळीचे बांधकाम करण्यासाठी अनेक झाडांची कत्तल करण्यास सुरुवात केलेली अहे विरारफाटा याठिकाणी ज्याप्रमाणे अनधिकृत चाळी बांधणा-या भुमाफिया लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला अहे त्याच प्रमाणे चिंचोटी येथील जमीनीवर अनाधिकृत बांधकाम करणा-या चाळ माफिया लोकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई प्रशासन मार्फ़त होणे गरजेचे आहे. वरील सर्वे नंबर च्या जागेमधील सर्व अनधिकृत चाळीचे बांधकाम व फाउंडेशनचे बांधकाम निष्काशीत करावे अशी मागणी बहुजन महापार्टीचे जिल्हा अध्यक्ष परेश घाटाल यांनी मा आयुक्त वसई विरार मनपा मा अतिरिक्त आयुक्त मनपा मा उपायुक्त व मा.सहा आयुक्त प्रभाग समिती जी वालीव यांच्या कार्यालयात लेखी पत्राद्वारे केली आहे व सदर जागेमध्ये कोणीही अनधिकृत बांधकाम केल्यास एम आर टी पी एक्ट प्रमाणे कारवाई केली जाईल असे समज पत्र अनधिकृत बांधकाम धारकास देण्यात यावे अशी मागणी महानगर पालिकेच्या आयुक्त यांचेकड़े करण्यात आली आहे.तसेच सदर जागेची भूमि अभिलेख कार्यालयातून अद्याप मोजणी झालेली नाही.या जमीनीला लागून सर्वे नंबर 54 ची सरकारी जमीन आहे व सरकारी जमीन हड़प करण्याचा या भूमाफिया लोकांचा मनसूबा आहे. त्यामुळे सरकारी जमीनीवर अनधिकृत बांधकाम करून नागरिकाची आर्थिक फसवनुक करण्याचा या भूमाफिया लोकांचा मनसूबा आहे. सदर ठिकाणी नागरिकांची फसवनुक होवू नये याकारिता सरकारी जमीनीवर शासनाचा फलक लावून कोणीही अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल केले जाईल असे फलक लावणे बाबत आम्ही शासनाकड़े मागणी केली असून सदर परिसरातील सर्व जमीनीची सरकारी मोजणी होई पर्यंत कोणालाही अनधिकृत बांधकाम करू देवू नये व सदर जागेमधील अनधिकृत बांधकाम निष्काषित करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार वसई यांच्याकड़े देखील करण्यात आली आहे व सरकारी जमीनीवर कोणालाही अनधिकृत बांधकाम करू देवू नये याबाबतचे योग्य आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात यावे अशी मागणी परेश घाटाल यानी महानगरपालिकेकडे व तहसीलदार वसई यांच्याकड़े केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *