
वसईत शिवशक्तीला भीमशक्तीचे बळ!पक्षवाढीचे काम जोमाने करा! आमदार सुनील शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन…
विरार- वसई-विरार आणि परिसरात शिवसेनेच्या मागे भीमशक्ती नेहमीच सावलीसारखी उभी राहिली आहे.याचाच अनुभव पुन्हा आला. काहि दिवसांपुर्वी रानगाव येथील ग्रामपंचायत शिवशक्ती व भिमशक्तीचा युती करून निवडणूक लढवली असता त्यामध्ये भरघोस यशानंतर दि. १ एप्रिल २०२३ रोजी विरार-आगाशी येथील आंबेडकर नगर येथे झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने या ऐक्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
आगाशी, चाळपेठ, अर्नाळा, चाळपेठ व उंबरगोठण तसेच आगाशी आंबेडकर नगरमधील सहा पाड्यांचे नेतृत्व करणारे माननीय प्रभाकर वागळे व त्यांच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी नालासोपारा विधानसभा सहसंपर्कप्रमुख महेश राऊत व माजी नगरसेवक राजन पाटिल यांच्या प्रयत्नाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यकर्ता प्रवेशाच्या निमित्ताने शिवशक्तीला भीमशक्तीचे पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.
माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शिंदे तसेच पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, वसई विधानसभा संपर्कप्रमुख जगदीश कदम आणि नालासोपारा विधानसभा सहसंपर्कप्रमुख महेश राऊत यांच्या उपस्थितीत झाला. या प्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्ते तसेच महिलांनी शिवबंधन बांधले.
काही महिन्यांपुर्वी मा.सुषमाताई अंधारे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणारे वसई तालुक्यात आंबेडकरी चळवळितील दबदबा असणारे ऍड. गिरीश दिवाणजी यांची जिल्हा सहसचिव (नालासोपारा विधानसभा क्षेत्र ) पदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर अनेक प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना तालुका, शहर तसेच शाखा पातळीवरील पदे देऊन शिवसेनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
आपल्या विभागात तसेच तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीकरता जोमाने प्रयत्न करा, असे आवाहन आमदार तथा पालघर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. तर विविध शिबिरे व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपला पक्ष घराघरात नेऊ, असा विश्वास जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिला. शिवसेना जिल्हा संघटक किरण चेंदवणकर यांनीही महिलांनी आघाडीवर राहून बचत गट काढावेत व विविध माध्यमांतून शिवसेना पक्षवाढीचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पालघर उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, वसई-विरार शहर संघटक विनायक निकम, तालुका संघटक (नालासोपारा विधानसभा) , माजी नगरसेवक राजन पाटील, महेश म्हात्रे, तालुका समन्वयक पुष्पाताई घोडविंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते…