
वसई प्रतिनिधी : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती संपूर्ण जगभरात साजरी होत असताना गावा खेड्या पाड्यात शहात अनेक ठिकाणी बाबासाहेबांची जयंती वेगवेगळे उपक्रम घेऊन जयंती साजरी झाली व होत आहे त्याच अनुषंगाने गौतमनगर, गास (निर्मळ) रहिवासी संघ तर्फे दोन दिवसीय जयंती साजरी करण्यात आली १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता समता सैनिक दल-भारतीय बौद्ध महासभा : वसई पश्चिम शाखा संपूर्ण सैनिक व पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. तदनंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. सकाळी ९.३० वाजता अल्पोपहार करण्यात आला व नंतर निर्मळ नाका ते गौतमनगर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत निर्मळ गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी चाय, नास्ता, पाणि इ. ची व्यवस्था केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दुपारी २.०० वाजता सर्वांचे स्नेहभोजन झाले. संध्याकाळी ६.०० जयंती निमित्ताने गौतमनगर मधील कार्यकत्यांनी प्रत्येकांच्या घरी जाऊन १३२ व्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शनिवार दि. १५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता जाहीर सभा घेण्यात आली सदर सभा गौतमनगर मध्ये झाली सभेचे अध्यक्ष स्थान मा. पंकज चोरघे (माजी : सभापती/नगरसेवक : वसई विरार शहर महानगरपालिका) यांना देण्यात आले होते. कार्यक्रमांची प्रस्थावना आद. कृष्णाजी चव्हाण यांनी मांडली. प्रमुख व्यक्ते प्रा. आत्माराम गोडबोले सर (कवी / लेखक) यांनी आपल्या कवी लेखनातून लोकांना एक जागी बसवून ठेवले आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिली गोडबोले सरानी स्वतः लिखित कविता सादर केल्या. प्रमुख पाहुणे : प्रा. डॉ. भिमराव होनपारखे व प्रा. पि.एम. पगारे सर यांनी सुध्दा शिक्षणाबद्दल माहिती देऊन जयंती च्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थिती मध्ये आद. किरण गायकवाड (भारतीय बौद्ध महासभा-पालघर जिल्हा अध्यक्ष), डॉ. रणधीर ढाकरके व अँड. चेतन भोईर (भिम प्रेरणा जागृती संस्था-अध्यक्ष) सभेत उपस्थित राहून मोलाचे योगदान दिले.सुत्रसंचालन पत्रकार हरेश गणपत मोहिते यांनी केले तर शेवटचे आभार गौतमनगर, गास निर्मळ रहिवासी संघाचे अध्यक्ष मंगेश क. मोहिते यांनी मानले. उपाध्यक्ष : अशोक राऊत व खजिनदार : राकेश चव्हाण सहसेक्रेटरी : अनंत चव्हाण आणि संपूर्ण विभाग प्रमुख व संपूर्ण महिला यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास अतिशय मोलाचे योगदान दिले.