शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले आहे या – अभियानाअंर्गत नागरीकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनीधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येवून विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

  • पालघर जिल्हयामध्ये दिनांक १५.४.२०२३ ते १५.६.२०२३ या कालावधीत जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबविण्यत येणार आहे. या कार्यक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जन कल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हा जन कल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे ते सर्व विभागांशी समन्वय साधुन कामाचा आढावा घेणार आहेत तसेच तालुकास्तरावर जन कल्याण कक्ष स्थापन करण्यात करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद, महानगर पालिका व प्रत्येक विभागाने जन कल्याण कक्ष स्थापन करावयाचे आहे. तालुका पातळीवरील सर्व अधिकारी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांचेशी समन्वय साधुन अंमलबजावणी करतील.

जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम

करतील. या उपक्रमाची पुर्वतयारी दिनांक १५.४.२०२३ ते १५.५.२०२३ या कालावधीत करण्यात

येणार आहे. या कालावधीत नागरीकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित

लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरून घेणेत येणार आहे..

प्रत्येक जिल्हयामध्ये किमान ७५ हजार लाभाथ्र्यांना थेट लाभ मिळण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे..

  • विविध विभागांचे स्थानिक पातळीवरील कर्मचारी सरकारच्या योजनांची प्रत्येक गरजू पर्यंत माहिती पोहचविणे व त्यांना अर्ज करण्यासाठी मदत करणार आहेत तसेच त्यांच्या कार्यरत क्षेत्रात (गाव, वार्ड, शहर) प्रत्येक घरी जाऊन अभियानाची माहिती देण्यात येणार आहे. (हर घर दस्तक)

गावात/वार्ड परिसरात नोंदणी साठी किमान एक दिवसीय विशेष कॅम्प चे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी गावातील जास्तीत जास्त गरजुंची नोंदणी करुन घेण्यात येणार आहे.

  • आपले सरकार सेवा केंद्र (csc) व सेतू सुविधा केंद्रावर लाभार्थ्यांच्या नोंदणीची विशेष सोय करण्यात

येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *