
बोईसर येथे मध्यरात्रीच्या वेळी गुरे पळविणाऱ्या टोळीने बेशुद्ध केलेल्या जनावरांवर अंधारात तात्काळ उपचार करून पशुंचा जीव वाचविणारे डॉ.सोनावले व डॉ. राहुल संखे , विक्रमगड तालुक्यातील अपघाताने बाधित गोधन प्राणदाते डॉ. कारले, वाडा तालुक्यातील कुयलू ग्रामपंचायत हद्दीतील चांदीवली गावच्या आदिवासी पशुपालक लक्ष्मण कुसळ यांची चार जनावरे बेशुध्द अवस्थेत असता, पशुपालक यांनी कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे यांना संपर्क साधला व सभापतींनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आसवले व इतर कर्मचारी यांना सदर ठिकाणी पाठवले व चारही जनावरांचे प्राण वाचविले. यामुळे पशुवैद्यकीय उपचार तात्काळ केल्याने चारही पशुंचे प्राण वाचवल्याने त्यांचे पशुसंवर्धन विषय समिती सदस्य सुनीता धूम, मंगेश भोईर ,अक्षय दवणेकर यांच्या हस्ते सभापती संदीप पावडे व डॉक्टरांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करून त्यांचे आभार मानले. तसेच यापुढेही सतर्क राहून तात्काळ उपचार करण्यात येतील अशी आशा व्यक्त केली.
काल दिनांक १९/४/२०२३ रोजी रोजी जिल्हा परिषद पालघर पशुसंवर्धन विभागाची समिती सभा कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
या सभेत योजना संबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. समिती सभेमध्ये गुरे चोरी करणाऱ्या टोळीचे पशुंना गुंगीचे इंजेक्शन देऊन चोरी करण्याचे प्रमाण बेसुमार वाढलेले आहे, त्यावर उपाययोजना करून चोरीला प्रतिबंध घालण्यावरती चर्चा करण्यात आली .