
कोल्हापूर – स्त्री दर्पणच्या संपादिका तेहसीन चिंचोलकर व शिवसेना नालासोपारा महिला आघाडी नजमा पठाण नालासोपारा मुंबई पालघर येथून संपादिका तेहसीन यांच्या कोल्हापूर येथील घरी ए पी आय इरफान नदाफ (मीरा भाईंदर वसई विरार ), रिटायर्ड एम. नदाफ असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर सांगली व रमजान कुठवाडे सामाजिक कार्यकर्ता म्हैशाळ (जिल्हा कोल्हापूर-सांगली) ईद निमित्त भेट घेतली. त्यावेळी चिंचोलकर यांनी सामाजिक विषयावर चर्चा करुन आपले मत मांडले. तसेच पुढील भविष्यात सशक्त महिलांच्या विषयावर सांगली व कोल्हापूर येथे सामाजिक कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रसंगी नदाफ साहेब यांनी या उपक्रम ला सहकार्य असणार आहे अशी ग्वाही तेहसीन आणि तेथील मित्र मंडळी यांच्या समोर देण्यात आले या खेळी मेळीच्या वातावरणात अकबर पाथरवट, दिलावर पठाण, आदी उपस्थित होते.
