
बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या उपस्थितीत आम. राजेश पाटील यांच्या हस्तेभूमीपुजन
वसई : (प्रतिनिधी) :
नरेंद्र एच. पाटील
तुंगारेश्वर येथील देवस्थान मार्गातील नदीवरील पुलाचे बांधकामाचा भूमीपुजन सोहळा सोमवारी (दि.24 एप्रिल) बालयोयी श्री सदानंद महाराज यांच्या उपस्थितीत आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर सोहळा सकाळी ठीक 10 वाजता संपन्न झाला. या सोहळ्यास माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील, तुंगारेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा माजी सभापती रमेश घोरकना बालयोगी श्री सदानंद महाराज वनौषधी केंद्राचे पुरुषोत्तम पाटील. आश्रम संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ भोईर , भास्कर भोईर, वनाधिकारी चौरे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तुंगारेश्वर देवस्थानाकडे जाणार्या रस्त्याला दोन ठिकाणी नदी आडवी येत असल्याने पावसाळ्यात भक्तांची व पर्यटकांची मोठी गैरसोय होते. यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून कित्येक वर्षांपासून करण्यात येत असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले, परंतु वनविभागाच्या परवानगी अभावी पूल बांधणे अशक्य होते. आताचे वनआधिकारी चौरे व इतर अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या आशीर्वादाने पुलाचे काम मार्गी लागत असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. यासाठी 65 लाख रुपये मंजूर झाल्याची माहितीही आमदारांनी दिली. तसेच लोेकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांनीच हा पूल मंजूर झाला
असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यावेळी वालीवचे माजी सरपंच तथा तुंगारेश्वर देवस्थान कमिटीचे लक्ष्मण पाटील, चंद्रपाडा ग्रामपंच्यायत सदस्य हेमराज भोईर,
माजी सभापती बेटा भोईर, नगरसेवक प्रकाश चौधरी, मिलिंद घरत, मोहन महाडिक गावराई पाडा बविआ उपाध्यक्ष सदानंद भोईर, धर्मा पाटील, सुरेश मिश्रा आदि मान्यवर उपस्तित होते.