
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एच हद्दीत दिवाणमान सर्व्हे नंबर ७४/७, ७४/९ येथील सेंट पीटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अनधिकृत बांधकामाला एमआरटीपी नोटीस देण्यात आली आहे. मात्र त्या पलीकडे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की,वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एच हद्दीत दिवाणमान सर्व्हे नंबर ७४/७, ७४/९ येथील सेंट पीटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अनधिकृत बांधकामाला दि. ३०/९/२०२२ रोजी एमआरटीपी नोटीस देण्यात आली आहे. नोटीस दिल्यानंतर ३० दिवसात निष्कासन कारवाई व एमआरटीपी कायद्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून व्हायला हवी. मात्र नोटीस बजावून तोडपाणी करण्याचे काम प्रशासनाकडून केले गेले आहे.
महानगरपालिकेने अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांना किमान १० हजार नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र त्यातील १० टक्के अनधिकृत बांधकामांप्रकरणी एमआरटीपी गुन्हे दाखल केले असतील. निष्कासन कारवाई तर जास्तीत जास्त ५ टक्के! सेंट पीटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार, एमआरटीपी गुन्हा दाखल होणार की तोडपाणी होणार हा प्रश्न आहे.