
पालघर दि 28 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पुर्व आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस , जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे साईट डायरेक्टर ए. बी देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक संजय बोदाडे , जिल्हा पुरवठा अधिकारी पोपट ओमासे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग रवी पवार, रा.प.म चे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी प्रत्येक विभागाचा विभागनिहाय मान्सून बाबतीचा पुर्वतयारी, तसेच मान्सून येण्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन, याबाबत सुचना दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन यांनी प्रस्तावित करताना आपत्ती व्यवस्थापनाची विस्तृत माहिती दिली.