पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी मोखाडा व खोडाळा बीटातील विविध ठिकाणी भेटी देत विस्तृत पाहणी केली.

रविंद्र शिंदे यांनी पदभार स्विकारल्या पासून तालुक्यात विस्तृत आढावा घेण्याचा पायंडा सुरू ठेवला आहे. २७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता डोल्हारा स्मशानभुमीची प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील समस्या जाणून घेतल्या.

  मोखाडा तालुक्यात पोहचताच त्यांनी साखरी गावातील १५ व्या वित्त आयोगातून दलित वस्तीत सुधार योजनेतील रस्ता कामाची पाहणी केली.त्यानंतर  ग्रामपंचायतीने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली.तद्नंतर साखरी ग्रामपंचायतीचा आढावा घेतला.यानंतर वाशाळा पी एच सी ला भेट देत आढावा घेतला व मार्गदर्शन केले.यावेळी कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी शिंदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणारे निवासस्थान व अंतर्गत रस्ते दुरुस्ती बाबत सुचना केल्या.

पुढे खाचगळ्यातुन चालत जात पुलाची वाडी येथील बंधा-याला भेट देत पाहणी केली.
दोन दिवसाच्या पाहणी दौ-यात दुस-या दिवशी शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या निमित्ताने आयएसओ शाळा राजेवाडी येथे भेट देत विद्यार्थ्यांशी व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. नवगत मुलांचे स्वागत केले. गांडुळ खत उपक्रमाची पाहणी करून त्याबद्द सविस्तर जाणून घेतले.तद्नंतर किनिस्ते अंतर्गत येणा-या कामडवाडी येथील शेळी गटाला भेट देत पाहणी केली.खोडाळा गावातील घरकुलांची पाहणी करून खोडाळा पी एच सी ला भेट दिली. यानंतर खोडाळ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देत पाहणी केली व सुचना केल्या.
दरम्यान तालुक्यातील गाव खेडे-पाडे,वाडी वस्तीत दर्जात्मक व गुणात्मक सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहीजे या अनुषंगाने अधिकारी व कर्मचा-यांना सुचना केल्या. शिक्षण,आरोग्य,कृषीसह प्रत्येक विभागातील प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिक पणे व जबाबदारी पार पाडण्याच्या सुचना केल्या. तसेच हलगर्जीपणा करणा-याची गय केली जाणार नाही अशी सक्त ताकीद ही त्यांनी विभागप्रमुखांसह कर्मचा-यांना दिली तर चांगले काम करणा-या कर्मचा-यांचे कौतुक ही केले. पावसाळ्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सुचनाही यावेळी विभागप्रमुखांना रविंद्र शिंदे यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *