
सानिया राकेश कुंवर 92% घेऊन नायगाव येथील सेवेन स्क्वेअर शाळेतून उत्तम गुणांनी 10 वी उत्तीर्ण झाली . नायगाव येथील अजंता गार्डन्स सोसायटीत राहते .
शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सराव केला. माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी मला मोलाचे सहकार्य केले शिक्षकांच्या आणि माझ्या आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे आणि मदतीमुळे आज मी हे यश बघते आहे. आणि NCERT पुस्तके नीट वाचा. माझ्या आई-वडिलांचा खूप पाठिंबा होता, त्यामुळेच मला हे यश मिळाले. पुढे मला NEET परीक्षेची तयारी करायची आहे आणि डॉक्टर बनून समाजाची सेवा करायची आहे.
रोज ७/८ तास अभ्यास करायचो आणि तो नियमित होता त्यामुळे ताण येत नाही. जे काही शिकवलं जातं ते त्याच दिवशी ती पूर्ण करायची, त्यामुळे अभ्यासाचं कधीच ओझं वाटलं नाही आणि मी हे सगळं सहज केलं.
मला खेळायला वेळ मिळायचा, पण खेळण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष असायचं, त्यामुळे मी खूप कमी खेळायची.
आईने खूप काळजी घेतली . वेळच्या वेळी जेवण देणे शाळेतून घेऊन येणे सोडायला जाणे ट्युशनला आणणे सोडणे हे सगळं माझ्या आईने केले . मला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मला कोणतेही काम करू देत नव्हती. पप्पा रेल्वे जॉब ला असल्यामुळे त्यांना वेळ कमी मिळायचा पण जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेही अभ्यासात मदत करायचे . माझा लहान भाऊ घरामध्ये खेळताना आवाज न करता मला मदतच करायचा.
नायगाव परिसरातून, शाळेतून, आणि सोसायटीतून सानियाचे खूप कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.