
कृपया प्रसिद्धीसाठी
**
दिनांक 3 जुलै 2009 रोजी वसई विरार शहर महानगरपालीकेची स्थापना झाली होती. नागरीकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून स्थापन झालेल्या महानगरपालीकेला लवकरच 14 वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या महत्वाच्या विषयांवर महानगरपालिकेकडून उदासिनता तर आहेच परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे नव्याने निर्माण झालेले बुडणारी वसई, प्रदूषण, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आणि वाढत्या नागरीकरणामुळे वसई विरारचे कोलमडलेले नियोजन हे प्रश्न गंभीर स्वरूप घेत आहेत.
मागील अनेक वर्षापासून नागरीकांच्या समस्या घेवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य समीर सुभाष वर्तक सातत्याने त्यांच्या सहकाऱ्यांसोबत महानगरपालिकेत येत आहोत परंतु समस्यांचे निराकरण करणे राहीले दुरच माननीय आयुक्त आणि महानगरपालीकेतील इतर अधिकाऱ्यांची भेटही सर्वसामान्यांना मिळणे दुर्लभ होत आहे आणि सर्व प्रश्न जिथल्या तिथे पण महानगरपालीकेच्या अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे नवनवीन प्रकरणे दिवसेंदिवस बाहर घेत आहेत. म्हणूनच नागरिकांचे खालील महत्वाचे प्रश्न घेवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे गुरुवार दिनांक 1 जुन 2023 रोजी सकाळी 10. .00 वाजता वसई विरार शहर महानगरपालीकेच्या मुख्यालयावर खालील प्रलंबित विषयांसाठी *धडक मोर्चा* काढण्यात येणार आहे.
1) 2008 पासून सुरू झालेली 69 गावांची पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण का होत नाही? आम्हाला महानगरपालीका पाणी का देत नाही?
2) दिवाणमान येथील सर्व्हे नं. 176, आणि 177 मधील सर्वधर्मिय दफनभूमी तात्काळ सुरू करावी. महानगरपालीका क्षेत्रातील सर्वधर्मिय लोकसंख्येनुसार स्मशानभूमी, दफनभूमीचे निर्माण करावे.
3) महानगरपालीकेची परिवहन सेवा 24 तास असावी अन्यथा आमची एस. टी. महामंडळाची बससेवा चालू करा.
4) महानगरपालीका IIT आणि NEERI च्या अहवालाप्रमाणे नियोजन करणे तसेच होल्डींग पॉन्ड्स (धारण तलाव) बांधून, मोठे गटारे बांधून अनधिकृतपणे बंद केलेले नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्याचे सर्व मार्ग मोकळे करणे.
5) नागरीकांना त्रासदायक मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे तसेच साप पकडण्याची व्यवस्था पुन्हा चालू करणे.
6) तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली विद्रुपिकरण बंद करून पर्यावरणयुक्त तलावांचे संवर्धन करणे.
7) खड्डेयुक्त रस्ते पेव्हर ब्लॉकने न बनविता योग्य रीत्या दुरुस्त करणे.
8) सुसज्ज सरकारी दवाखाना तयार करून वसई विरारची आजारी आरोग्य व्यवस्था सुधारणे.
9) महानगरपालीकेची स्वतः ची शवविच्छेदनाची व्यवस्था तयार करून नागरीकांना होणारा मृत्यूनंतरच्या त्रासापासून दिलासा दयावा.
10) अब्जावधी रुपयांचा शिक्षणकर वसूल करूनही शिक्षण व्यवस्था आजपर्यंत महानगरपालीकेनी तयारी केलेली नाही तरी सर्वसामान्य व गरीबांसाठी विनामुल्य शिक्षण व्यवस्था तयार करावी.
11) वसई, विरार, नालासोपारा पूर्वेतील नागरीकांसाठी रस्ते, गटारे,दिवाबत्ती आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
12) महानगरपालीकेतील 872 आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व भूखंड ताब्यात घेवून संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे.
13) पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या पाणथळ जागा, कांदळवने आणि सरकारी जागांचे संरक्षण करणे तसेच तिथे अतिक्रमण करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करणे.
14) महानगरपालीकेची नावापुरता असलेली सदोष सिग्नलयंत्रणा दुरुस्त करणे.
15) सांडपाणी नियोजन व्यवस्था (STP) आणि घनकचरा व्यवस्थापनचे (WM) नियोजन करण्यासाठी महानगरपालीका पूर्णपणे चुकली आहे ज्यामुळे राष्ट्रीय हरित लवादतर्फे (NGT) जवळपास 190 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. यासाठी दोषी अधिकान्यां तर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्याकडुन हा दंड वसूल करावा
16) नियमबाह्य बनविलेले आणि धोकादायक असलेलर गतिरोधक दुरुस्त करून त्यावर पांढरे पट्टे मारणे.
17) अनाधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणि अनाधिकृत बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करणे.
18) महानगरपालीकेचे सुसज्ज क्रिडासंकुल बांधणे.
19) वसईतील ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन उदा. निर्मळमधील आद्यगुरू शंकराचार्य समाधी मंदीर, ऐतिहासिक बौद्धस्तूप, वसई व अर्नाळा येथील ऐतिहासिक किल्ले, ऐतिहासिक चर्चेस आणि धार्मिक स्थळे. इ.
20) समुद्र आणि नद्यांमध्ये केमिकलयुक्त प्रदुषित रसायने सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणे.
21)महानगरपालीका क्षेत्रात सुसज्जा स्वच्छतागृहे उभारावीत तसेच अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहाची योग्य स्वच्छता असावी.
22) पिढ्यानुपिढ्या वसईत राहणार स्थानिक भूमिपूत्र शेतकरी, आदिवासी, कोळी बांधवांच्या घराखालील जमिनी त्यांच्या नावावर करणे
23) करोडो रुपये खर्चुन बांधलेले हॅन्डवॉश सेंटर बंद का पडले? त्याठीकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
24) करोडो रुपये वृक्षकराच्या माध्यमातून महानगरपालीका वसूल करते परंतु झाडे लावणे व त्याचे संवर्धन करणे हे सर्व कधी करणार ?
25) फेरीवाला कायदा 2014 ची अंमलबजावणी करणे. तसेच नियमबाह्य बाज़ार कर घेणऱ्यांवर कारवाई करणे.
26) पाणथळ जागेतील अनाधिकृत भरावामुळे समुद्र किनारे गिळंकृत होत आहेत. महानगरपालीकेने मुंबईच्या धर्तीवर समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे तत्कार बांधावे.
अशा अनेक समस्यांसाठी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचा “धडक मोर्चा” असून हि सर्व कामे जनतेने निदर्शनास आणून देणे म्हणजे महानगरपालीका प्रशासनासाठी शरमेची बाब आहे. हे नागरीकांचे प्रश्न त्वरीत सुटावे म्हणून “धडक मोर्चा” आहे. तरी या प्रसंगी “कायदा व सुव्यवस्थेचा” काही प्रश्न उद्भवल्यास महानगरपालीका प्रशासनाचे प्रमुख माणून सर्वस्वी जबाबदारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांची राहील अशी सूचना श्री समीर सुभाष वर्तक यांनी दिलेली असून वसईतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या “धडक मोर्च्यामध्ये सामील व्हावे” असे आवाहन केलेले आहे.