
भाजप सरकार जाऊ द्या प्लॉट नावावर होऊ द्या अशी घोषणा देत अखिल भारतीय किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली १८ ते २० हजार शेतकऱ्यांनी छत्रपत्ती शिवाजी महाराज चौक पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले.
कसणारांच्या नावावर त्यांच्या ताब्यात असलेली जमीन झालीच पाहिजे, फॉरेस्ट मध्ये तोडलेल्या घरांना घरकुलांचे लाभ मिळाला पाहिजे, वन जमीन असणाऱ्यांच्या नावे खालीच पाहिजे, तुंगारेश्वर नोटिफिकेशन रद्द झाले पाहिजे, या करिता सर्व जमीन विषयक फॉर्म सरकार दरबारी सादर केले पाहिजेत. म्हणून किसान सभेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात काढण्यात आला.मोर्चे दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या सोबत शिष्ट मंडळाची बैठक घेण्यात आल्यानंतर वन जमीन, वरकस जमीन, देवस्थान इनाम जमीन, गायरान जमीन, तळ जमीन, महसुली जमीन असे विविध प्रकारचे फॉर्म भरण्याचे काम केले गेले .
वरकस जमिनी या सावकारांच्या नावावर आहेत ते मुंबई सुरत अहमदाबाद इथे राहतात प्रत्यक्षात आदिवासी त्या जमिनी कसतात येणाऱ्या पावसाळ्यात पीक पाण्याचे अर्ज केले जातील ते ग्राह्य धरून त्यांना कुळ लावणे आणि त्यांना जमिनी देणे हे दोन ते तीन महिन्यात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिल्याचे डॉक्टर अशोक ढवळे यांनी यावेळी सांगितले
मोर्चाच्या नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय मरियम ढवळे, किसन सभेचे राज्य सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले, सिटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले, राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले,
प्रमुख मागण्या
१) ताब्यात असलेली ४ हेक्टर पर्यंतची वन जमीन मंजूर करून, ७/१२ला कब्जेदार सदरी नोंद करा.
२) सर्व अपात्र वन दावे त्वरित मंजूर करा.
३) वरकस जमीन कसणारांच्या नावावर करा.
४ ) गायरान, देवस्थान, इनाम, महसुली जमीन कसणारांच्या नावावर करा.
५) घरांची तळ जमीन नावावर करा.
चौकट :
आम्ही आता फार वाट पाहणार नाही दिलेले आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर एक लाख कष्टकरी पावसाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव घालणार
६० हजार वन हक्क दाव्यापैकी ५१५७० दावे पात्र ठरले आहेत ही सर्व यादी जिल्हाधिकारी देणार आहेत त्यामुळे कोणाच्या नावावर किती क्षेत्र मिळाले आहे ते कळणार आहे