
पालघर 3 जून
शिक्षणाच्या योग्य प्रकारे उपयोग करणे ही काळाची गरज आहे. आपल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे., ध्येय ठेवून तुम्ही ज्या दिशेने जात होता ते तुम्ही गाठले आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम व देशात 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली पालघर जिल्ह्याची सुपुत्री कश्मीरा किशोर संखे हिच्या सत्कार समारंभात मनोर येथे केले..
मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट मध्ये कश्मीरा संख्येचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते
यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे,पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे नंदकुमार पाटील समीर पाटील बाबाजी कोठाळे डॉ. हेमंत सावरा संतोष जनाठे आदी उपस्थित होते.
या देशाचे नेतृत्व कोणीही करेल परंतु आता भारताची परिस्थिती अशी आहे, भारत देशाचे नेतृत्व नाही तर जगाचा नेतृत्व करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी कठीण असतात परंतु अशक्य काहीही नसते एखाद्या अधिकारी काय करू शकतो आणि काय घडवू शकतो याची अनेक उदाहरणं आज देशात आहेत. आम्हा सर्व भारतीयांना अशाच अधिकाऱ्यांची गरज आहे जे देशाला दिशा देतील व देशाला विकासाच्या दिशेकडे घेऊन जातील. देशाला दिशा चांगला अधिकारी देऊ शकतो. आपण आपल्या आयुष्याची सुरुवात राष्ट्राच्या अखंड उद्धाराच्या दृष्टिकोनातून केली तर अनेक मार्ग मिळत जातील असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.