
पालघर दि. 3 : शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला
जव्हार, मोखाडा तालुक्यातील नागरिकांसाठी ‘शासन आपल्या दारी, या अभियानाचे आयोजन जव्हार येथे करण्यात आले होते त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावीत, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनील भुसारा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जव्हार, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, व विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी उपस्थित होते.
सरकारने योजना जाहीर केली तेव्हापासून त्या योजनेच्या गरजू लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे हेच गतिमान सरकारचे ध्येय आहे. शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत एका छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे . जिल्ह्यातील अधिकारी वर्गानी शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गरजू व्यक्तीपर्यंत विविध योजनेचा लाभ पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी गाव/ पाडे या ठिकाणी पोहचून गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे असे सर्व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी कौतुकास पात्र आहे. असे सांगून नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी अधिकारी वर्गांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रेरणा दिली
‘शासन आपल्या दारी,या अभियानअंतर्गत आत्तापर्यंत जव्हार व मोखाडा तालुक्यातील 25 हजार 491 लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.