पालघर दि. 16 : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा शासन देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जव्हार व डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांअतर्गत आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना टॅब, सायकल व इतर आवश्यक शैक्षणिक वस्तुंचे वाटप पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पालकमंत्री श्री चव्हाण बोलत होते.
आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव प्रदिपकुमार व्यास, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आयुषी सिंह तसेच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन त्यांना उत्तम नागरीक घडविणे हे शिक्षकांच्या हाती असल्याने शिक्षकांनी तळमळीने दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध विषय शिकवण्याचे कौशल्य असलेल्या शिक्षकांनी ऑन लाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले पाहिजे असेहि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
सायवन ता. डहाणू येथिल शासकीय नुतन आश्रमशाळेच्या इमारतीचे तसेच मेंढवण ता. पालघर येथिल आश्रमशाळेच्या नुतन इमारतीचे लोकार्पण आणि तवा ता. डहाणू येथिल आश्रमशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले.
यावेळी सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, विनोद निकोले डहाणू नगर परीषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत तसेच आश्रम शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध
-पालकमंत्री रविंद्र चव्हाण