..

B

.पालघर दि.27: जलशक्ती मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी पालघर जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार केला असून हा अहवाल जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे सोपविला आहे.

. भूजल व्यवस्थापनाशी संबंधित जलसंपदा, पाटबंधारे, जलसंधारण, कृषि आदी विभागांना हा अहवाल उपलब्ध करून या अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांवर काम करण्याची सूचना श्री. बोडके, यांनी यावेळी केली.
.जव्हारच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्क जिल्हाधिकारी आयुषी सिंह, डहाणू प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महापात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी कोळेकर, केंद्रीय भूज बोर्डाचे वैज्ञानिक तथा प्रभारी अधिकारी डॉ. जे. दाविथुराज, वैज्ञानिक संदीप वाघमारे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे पालघर येथील वरिष्ठ वैज्ञानिक शिवलिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
.केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जलधर नकाशे तयार करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत पालघर जिल्ह्यातील भूजल पातळी, भूस्तराची स्थिती आदींचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. सन 2022-23 मध्ये जिल्ह्याच्या आठ तालुक्याचा समावेश जलधर नकाशामध्ये करण्यात आला आहे. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा तयार करून तो जिल्ह्यात राबविण्याची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी भूजल व्यवस्थापन आराखडाही सुचविण्यात आला आहे.
उपाय योजनाबाबत सखोल अभ्यास
.केंद्रीय भूजल बोर्डाने केलेल्या या आराखड्यामध्ये पर्जन्यमान, जलधर प्रणालीचे प्रकार व वैशिष्ट्ये, सिंचन तसेच नगदी पिकासाठी भूजल उपशाचा भूजलावर येणार ताण, मर्यादीत भूजल उपलब्धता, भूजल पातळीतली चढउतार, भूजल गुणवत्ता, जिल्ह्यातील भूगर्भस्थिती, माती व जमिनीचा वापर यांचा अभ्यास करून अहवालामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अहवालात सुचविलेला आराखडा राबवित असताना भूजलावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून जिल्ह्याचा भूजलावर आधारित शाश्वत विकास साधता येईल, असे या अहवालात नमूद केले आहे.
अहवालातील वैशिष्ट्ये
.जिल्ह्यातील 4 हजार 358वर्ग किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी 2 हजार 355 वर्ग किलोमीटर क्षेत्र हे पहाडी क्षेत्र आणि बसाल्ट खडकाने व्यापलेले आहे.झिज झालेल्या खडकांची जाडी ही 5 ते 30 मीटर आढळून आली जिल्ह्यात भूजल विकासाची स्थिती सरासरी ही 23.5. टक्के – कमी जल उत्पादकात असलेले जलधर आढळून येत आहे जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट आढळून येत आहे.
व्यवस्थापन आराखड्यातील सूचना
.भूजलाचा मागणी व पुरवठ्याचा आराखडा तयार केला.भुजल पुरवठच्या दृष्टीने जिल्हयात 4 चेक डॅम व 126 पुर्नभरण शापटृस करण्याचे सुचविले आहे. ज्यामुळे जिल्हयाच्या भुजल साधानामध्ये 4.10 द.ल.घ.मि प्रतिवर्ष वाढ सभाविंत आहे. पाणी पातळी अतिशय उथळ असल्याने आणि भूजल विकासाची स्थिती फक्त 23.5 टक्के असल्याने पुरवठा व्यवस्थापन सुचविण्यात आले नाही. मात्र, पाणी वाचविण्यासाठी भूजलाची मागणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती आवलंबविण्याची सूचना ठिबकचा वापर केल्यास वार्षिक 3.41 दलघमी पाण्याची बचत जिल्ह्यात होईल. यामुळे जिल्ह्यातील 12 हजार 805 हेक्टर क्षेत्र शाश्वत भूजल सिंचनाखाली येईल. हे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी 4 हजार 993 विहिरी व 833 विंधन विहिरी अहवालात सुचविण्यात आल्या आहेत.
.जेथे पाण्याची पातळी खोलावर गेली आहे अशा क्षेत्रासाठी सलग समतल चर (कंटूर ट्रेन्चिंग), नाला बंडिंग, गल्ली प्लगिंग यासारख्या कामे सुचविण्यात आली आहेत. लाभक्षेत्रामध्ये भूपृष्ठ जल व भूजलाचे नियोजन करणे आवश्यक आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद केलेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *