
जिथे सत्तेत राहण्यासाठी लोक साम दाम दंड भेद नीतीचा वापर करतात. लालसेपोटी निष्टा विसरतात अनेक कुटणीतीचा वापर करतात. पण वसई विरार च्या महापौर रुपेश जाधव यांनी राजकारणात एक अनोखे उदारण निर्माण केले आहे.
वसई विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी आपल्या पक्षातील अन्य नगरसेवकाला महापौर पदाची संधी मिळावी यासाठी आज स्वतः हून राजीनामा दिला. याला म्हणतात मोठया दिल्याचा महापौर !!!
वसई-विरार महापालिकेचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी असतांना देखील अनुसूचित जाती प्रवर्गातील रूपेश जाधव यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे ब वि आ चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना महापौर पदाचा ताज त्यांच्या शिरावर ठेवला. रूपेश जाधव यांनी पक्षाध्यक्षाचा विश्वास सार्थ ठरवून मागील वर्षभरात महानगरपालिकेत आपल्या कार्यपद्धतीचा ठसा उमटविला. यानंतर पक्षातील खुल्या प्रवर्गाच्या लायक उमेदवाराला महापौर पद मिळाले पाहिजे अशी इच्छा त्यांनी पक्षाध्यक्षाकडे व्यक्त केली. असे बविआ चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले. याबद्दल हितेंद्र ठाकूर यांनी रुपेश जाधव यांचे कौतुक केले.रुपेश जाधव हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वसई-विरार महानगर पालिकेच्या महापौर पदासारख्या सन्माननीय पदावर पोहचले. रूपेश जाधव हे आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे.सर्व समाजातील लोकांशी व्यक्तीगत संबंध व दांडगा जनसंपर्क , चळवळितिल विविध पक्षांशी मैत्रिसंबंध यामुळे त्यांनी आपल्याभोवती कार्यकर्त्याचे व सहकार्यांचा माहोल तयार केले. कोणत्याही व्यक्तींची समस्या स्वत: लक्ष घालुन तात्काळ सोडविण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे ते जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.
पहिल्यांदा २००५ मध्ये नालासोपारा नगरपरिषद निवडणुकीसाठी ते उभे राहिल्यानंतर त्यांना जनतेनी त्या निवडणुकीत सर्वांपेक्षा जास्त मताने निवडुन आणले. त्या निवडणुकीत निवडुन आलेल्या नगरसेवकांपैकी ते सर्वात कमी वयाचे नगरसेवक होते. यानंतर त्यांनी नगरसेवक आणि शिक्षण सभापती म्हणून नगरपालिकेत आपल्या कार्याचा दबदबा निर्माण केला. सन २०१० मध्ये वसई-विरार महानगर पालिकेची निर्मिती झाल्यानंतर ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडुन आले आणि त्यांची उपमहापौर म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षाने २०१५ मध्ये त्यांची वसई विरार महानगर पालिका सभापती म्हणून निवड केली. पुढे सन २०१७ मध्ये त्यांना खुल्या प्रवर्गातुन महापौर पदावर निवडुन दिले. रूपेश जाधव यांना
कोणतेही राजकीय पाठबळ नसताना केवळ स्वतःच्या कर्तृत्त्वावर आतापर्यंतचा कौतुकास्पद राजकीय प्रवास केला आहे.
त्यांनी आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दीत शहराची पाणी पुरवठा योजना सुरळीत केली तसेच सर्वांना पाण्याचे कनेक्शन खुले केले. नागरिकांना भरावा लागणारा शास्ति कर रद्द केला.
आरोग्य सेवा निशुल्क केली. वसई-विरार महानगरपालिकेला उत्कृष्ट कारभाराबद्ल दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला. रुपेश जाधव यांनी नालासोपारा येथील सम्राट अशोक कालीन बौद्ध स्तूपाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला व भरीव योगदान दिले. एवढ सगळ असताना केवळ दलित समाजाताला म्हणुन त्यांना संधि मिळालि हे म्हणने कितपत योग्य ? जे म्हणतात त्यांनि एकदा त्यांचा वार्डात जा , त्यांच्या वार्डात किति त्यांच्या समाजातले लोक मतदार आहेत त्याची संख्या १०% च्या अात अाणि तेहि open sit आणि ते एकटे येत नाहित तर सोबत ४ ते ५ सहकार्यांना निवडुन आणण्याची धमक दाखवतात .
इतरांना देखील महापौर पद उपभोगता यावा यासाठी आपण केलेला त्याग ही कौतुकास्पद तसेच अभिमानास्पद आहे, त्यांच्या त्यागाला सलाम. मि कोणत्याहि पक्षाचा पदाधिकारीअसलो तरि एक समाजबांधव म्हणून , एक त्यांचा सहकारि मित्र म्हणून आम्हाला रुपेश जाधव साहेबांचा अभिमान आहे .त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
