कलम ४६७ समाविष्ट करण्याचीही मागणी

विरार(प्रतिनिधी )-विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरात किशोर नाईक या विकासकाची बांधकाम परवानगी जशीच्या तशी वापरून मौजे विरार सर्वे नं २२६/४/अ या आदिवासी जागेवर २७ इमारतींचे बेकायदेशीरपणे ‘संतनगर’ नामक गृहसंकुल उभारण्यात आले आहे.याप्रकरणी वसई विरार मनपाच्या प्रभाग समिती बी चे सहा.आयुक्त सुरेश पाटील यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे निकटवर्तीय प्रमोद दळवीसह १४ विकासकांविरोधात २३ मे २०२३ रोजी विरार पोलीस ठाण्यात ३४,४२०,४६८,४७१ तसेच एम.आर.टी.पी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.विशेष म्हणजे सदरचा गुन्हा दाखल करताना विरार पोलिसांनी कलम ४६७ हे कलम समाविष्ट केले नाही.परिणामी यातील काही आरोपींनी न्यायालयातून जामीन प्राप्त केला आहे तर काही आरोपी अद्याप फरार असून तेही जामीन घेण्याच्या तयारीत आहेत.विशेष म्हणजे या गृहसंकुलातील सदनिकांची खरेदी विक्री झाल्याने करोडो रुपयांचा व्यवहार झाला आहे.वास्तविक गुन्हयाची व्याप्ती सुमारे आठ ते दहा करोड पेक्षा जास्त असल्याने सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करणे देखील आवश्यक असल्याचे मत या प्रकरणातील तक्रारदार विनायक भोसले यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान याप्रकरणी त्यांनी वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना लेखी निवेदन सादर करुन ‘संतनगर’ गृहसंकुल गुन्ह्याच्या तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.शिवाय या गुन्ह्यात कलम ४६७ समाविष्ट करण्याचीही विनंती भोसले यांनी केली आहे.
तक्रारदार भोसले यांनी अधिक माहिती देताना सांगितले की,’संतनगर’ गृहसंकुल उभारताना वापरण्यात आलेली बांधकाम परवानगी विकासक किशोर नाईक यांनी प्रमोद दळवी व ईतर ह्यांना दिलेली नाही किंवा किशोर नाईक ह्यांनी प्रमोद दळवी व ईतर ह्याचेशी कुठलालाही विकसन करार अथवा कुलमुखत्यारपत्र देखिल दिलेले नाही. त्यामुळे सदरची बांधकाम परवानगी वापरण्याचा कुठलाच अधिकार प्रमोद दळवी व ईतर यांना नाही म्हणुन सदरची बांधकाम परवानगी ही बोगस म्हणूनच गणली गेली पाहीजे.सदरची बांधकाम परवानगी वापरून या गुन्ह्यातील नमूद विकासकांनी दस्त नोंदणी केलेली असून या दस्ताच्या आधारे सदनिकेचा खरेदी विक्री व्यवहार पार पडलेला आहे तसेच पैशाची देवाणघेवाण करण्यात आलेली आहे.त्यामुळे भारतीय दंड विधान सहिता कलम ४६७ प्रमाणे कोणताही मूल्यवान रोखा मृत्युपत्र अथवा मूल्यवान रोखा तयार करण्यासाठी हस्तांतरित करण्यासाठी किंवा कोणत्याही पैसे इत्यादी घेण्यासाठी द्यावयाचे प्राधिकार पत्र यांचे बनावटीकरण केले असल्यास या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान आहे.सदरच्या गुन्हयात देखील बनावट व बोगस बांधकाम परवानगीचा वापर करून दस्ताची नोंदणी केली असल्याने व त्या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे सदनिकेचा विक्री करारनामा करून त्या आधारे पैशाची देवाण-घेवाण केली असल्याने भादविस ४६७ प्रमाणे गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याचे तक्रारदार विनायक भोसले यांनी सांगितले.तसेच सदर जागेवर ऊभारलेल्या ईमारती या आदिवासी जागेत असुन आदिवासी मालकांना देखिल बांधकाम परवानगी घेतलेली आहे असे सांगुन त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे तसेच सदरच्या गुन्हयाची व्याप्ती सुमारे आठ ते दहा करोड पेक्षा जास्त असल्याने सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करणे देखील आवश्यक आहे.त्यामुळे विरार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०६/२०१३या गुन्हयात ४६७ हे कलम वाढविण्याचा आदेश द्यावा व सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा यांना वर्ग करावा अशी विनंती भोसले यांनी केली आहे.


नेमके प्रकरण काय-

विरार पूर्वेकडील मनवेल परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘संतनगर’ नामक गृहसंकुलात १) संत ज्ञानेश्वर अपार्टमेंट,२)संत गाडगेबाबा अपार्टमेंट,३) संत चक्रधर अपार्टमेंट,४) संत तुकाराम अपार्टमेंट,५) संत निवृत्ती अपार्टमेंट, ६) संत गोराकुंभार अपार्टमेंट,७) संत मुक्ताबाई अपार्टमेंट, ८)व्हि. एन. संकुल अपार्टमेंट,९) संत चोखामेळा अपार्टमेंट, १०)संत जनाबाई अपार्टमेंट, ११) संत रामदास अपार्टमेंट,१२) संत बहिणाबाई अपार्टमेंट,१३)संत सोपान अपार्टमेंट, १४)वरद विनायक अपार्टमेंट,१५)संत नामदेव अपार्टमेंट, १६)संत कबीर अपार्टमेंट,१७) संत मिराबाई अपार्टमेंट,१८)संत एकनाथ अपार्टमेंट अश्या १८ इमारती उभारल्या प्रकरणी १)मे.सुगंधा इंटरप्रायजेस तर्फे निलेश गावड,२)मे.जे. बी. कंन्स्ट्रक्शनचे राजेंद्र गायकवाड,३)मे.ओमसाई कंन्स्ट्रक्शनचे संजोग यंदे,४)मे. जय एंन्टरप्रायजेस तर्फे जयेश नाटेकर,५)मे.ओमकार डेव्हलपर्स तर्फे प्रमोद वैदय,६)मे.एकविरा बिल्डर्स ऍन्ड डेव्हलपर्स तर्फे अशोक महादेव दहिबावकर,७)मे. व्हि. एन. डेव्हलपर्स तर्फे नागेंदर सिंह,८)मे.जी. बी. कंन्स्ट्रक्शन तर्फे समीर बिडये,९) मे.आसरा इंटरप्रायजेस तर्फे विवेक राजापकर,१०)मे.ओमकार डेव्हलपर्स तर्फे धनेश खानोलकर,११)मे.तेजस कंन्स्ट्रक्शन तर्फे प्रमोद दळवी,१२) मे.आम साई कन्स्ट्रक्शन तर्फे धनेश राऊत,१३) मे.जय मातादी कंन्स्ट्रक्शन तर्फे प्रकाश दामोदर पाटील,१४)मे.मंगलम डेव्हलपर्स तर्फे देवराज यादव आदी १४ विकासकांविरोधात २३ मे २०२३ रोजी विरार पोलीस ठाण्यात ३४,४२०,४६८,४७१ तसेच एम.आर.टी.पी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.विशेष म्हणजे सदरच्या इमारती या किशोर नाईक यांना दिलेली बांधकाम परवानगी वापरून सर्वे नं २२६/४/अ या आदिवासी जागेवर उभारण्यात आल्या आहेत.


प्रमोद दळवी,प्रकाश पाटील विरोधात आणखी एक गुन्हा

दरम्यान ‘संतनगर’ नामक गृहसंकुलातील आरोपी प्रमोद मुकुंद दळवी,प्रकाश दामोदर पाटील यांच्या विरोधात संतोष शेट्टी नामक इसमाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विरार पोलीस ठाण्यात कलम ३२४,३२३,५०४,५०६,४२७,१४३,१४७,१४९ अनव्ये २५ जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे.दि.२५ जून रोजी जमिन मालक राजेंद्र घरत, प्रकाश दामोदर पाटील, प्रमोद मुकुंद दळवी व इतर यांनी फिर्यादी संतोष शेट्टी यांना शिवीगाळ व दमदाटी करून ठोश्याबुक्यांने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *