
राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेसाहेबांच्या हस्ते विविध विभाग व सेलमधील प्रत्येकी 8 कर्तबगार महिलांचा शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी काँग्रेस मुख्यालय टिळकभवनात सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रदेशप्रमुख मा. समीर सुभाष वर्तक यांच्या शिफारशीनुसार पर्यावरण विभागातील 9 कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभाग जिल्हा उपाध्यक्षा, माजी पंचायत समिती व कौलार बुद्रुक ग्रामपंचायत माजी सदस्या, हरित वसईपासून चळवळीतील कार्यकर्त्या सौ हेलन जोसेफ कर्व्हालो यांनाही विशेष गौरविण्यात आले.
या सत्कार कार्यक्रमात मा. समीर सुभाष वर्तक यांच्या पर्यावरण विभागातील पुढील महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
- सौ. हेलन जासेफ कर्व्हालो,
उपाध्यक्षा, वसई विरार शहर जिल्हा कॉम्प्रेस कमिटी. - श्रीमती रुबीना अम्मार पटेल,
सरचिटणीस, ठाणे शहर जिल्हा कॉग्रेस कमिटी. - सौ. मिराताई पांडुरंग शेटे,
उपाध्यक्षा, अहमदनगर ग्रा. जिल्हा काँग्रेस कमिटी. - सौ. भावना निलेश बोराटे,
उपाध्यक्षा, पुणे शहर काँग्रेस कमिटी. - सौ रिना गुलशन खांडेकर,
जिल्हाप्रमुख, कल्याण डोंबिवली कॉग्रेस कमिटी. - सौ वर्षा विजय शिखरे,
सरचिटणीस, पर्यावरण विभाग प्रदेश कमिटी. - सौ. सुलेखा अंबादास कांबळे (कारेपूरकर),
जिल्हाप्रमुख, लातूर शहर काँग्रेस कमिटी. - सौ. हेमलता बनन माने,
उपाध्यक्षा, कोल्हापूर (ग्रा.) जिल्हा काँग्रेस कमिटी. - सौ. मिलन रविंद्र गुरव,
तालुकाप्रमुख, चिपळूण, जिल्हा:रत्नागिरी याप्रसंगी पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री धनंजय पाटील आणि श्री सुरेश गवळी, वसई विरार जिल्हा काँग्रेसचे जिल्हाप्रमुख डेरीक फूर्ट्याडो आणि ठाणे शहर उपाध्यक्ष श्री इक्बाल शेख हे देखील उपस्थित होते.

