
युवाशक्ती फाऊंडेशनच्या पत्र व्यवहार आणि पाठपुराव्यामुळे २०१७ च्या जी.आर ला तात्पुरती १५ दिवस वयोमर्यादेची शीथीलता मिळाली. या मोहीमेत सर्वप्रथम ” सेंट ॲलाइंसेनंस ” शाळेनी त्वरित पाठिंबा दिला होता आणि अता ही विध्यार्थ्यांना त्याच्या वर्गात बसु दिले ज्यामुळे मुलांचे शिक्षण अखंडीत चालु राहील. याच प्रमाणे ” कारमालेट ” शाळेनेही मुलांचे नुकसान न करता त्यानला वर्गात बसु दिले आहे .
हा लढा इथे थांबत नाही जोपर्यंत पुरक बदल करुन योग्य बदल हे शिक्षण खाते / प्रशासन करत नाही तोपर्यंत आम्ही आमचा पाठपुरावा चालु ठेवु .
अशी १५ दिवसांची वयोमर्यादा शिथील करुन ही खुप पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होतच आहे यावर सरकारनी पुरक मार्ग काढणे आवश्यक आहे.
नाहीतर उरवरित पालक त्यांच्या पाल्यांसह रस्त्यावर उतरणार आहेत. या पेक्षा दैनिय अवस्था असुच शकत नाही की लहान चिमुकल्यांना स्वत:च्या शिक्षणासाठी रस्त्यावर यावे लागणार .जिथे आपण सांगतो शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे मग हे का घडतय .
झोपलेले शिक्षण खाते / सरकार कधी जागे हेणार ?
या चिमुकल्या विध्यार्थ्याॅना त्यांचा हक्क कधी मिळणार ?
युवाशक्ती फाऊंडेशन अवाहन करते पुढच्या वाटचालीत आमच्या सोबत रहा सर्व पालक व शाळांनी एकत्र या आम्हाला पत्र द्या आणि अन्यायाला वाचा फोडां
आता पर्यंत सोबत दिलेल्या शाळा व पालकांचे मनपुर्वक धन्यवाद