
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर येथील मिलिंद कला महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन व शासकीय रक्त पेढी घाटी यांच्या संयुक्त विद्ममाने दि.१४जानेवारी २०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमांसाठी मिलिंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.व्ही.के. खिल्लारे, आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संदेश वाघ तसेच शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉ.अरविंद गायकवाड , आदी सह मान्यवरांची उपस्थिती होती. आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन तर्फे डॉ संदेश वाघ यांनी प्राचार्य डॉ वैशाली प्रधान तसेच प्राचार्य डॉ व्ही के.खिल्लारे यांचे रक्तदान करण्याच्या बेस्ट प्रॅक्टिस बद्दल सत्कार करण्यात आला.
समन्वयक म्हणून मिलिंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाँ. संतोष बुरुकुल, डॉ. एन एम करडे, डॉक्टर सुरज बन्सी राष्ट्रीय सेवा योजना ,डॉ. जितेंद्र दिसले ,डॉ. ए.पी.बारगजे प्रा.विकास गवई यांची महत्त्वाची भूमिका होती.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना आणि एन सी सी तथा आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन च्या विद्यार्थी युनिट तथा महाविद्यालयीन कर्मचारी यांनी रक्तदान केले.या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.