

सख्य महिला मार्गदर्शन केंद्र* सन १९८७ पासून लिगभेदावर आधारित महिलांवर होणारी हिंसा आणि त्यासारख्या इतर समस्यांवर पालघर आणि ठाणे जिल्हा विभागात कार्यरत आहे.
स्त्री – पुरुष समानता आणि समान न्याय प्रस्थपित करणे हे आपले प्रमुख ध्येय साध्य करण्यासाठी सख्य उपचारत्मक, प्रेरणात्मक व प्रतिबंधात्मक स्तरावर कार्य करीत आहे. प्रशिक्षण कार्यक्रम, समुपदेशन सेवा, जनजागृती व वस्ती पातळीवरील कार्यातून महीला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आहे,
उपजीविकेचे साधन आणि आर्थिक विकास ह्या दृष्टी ने सख्य संस्थेमार्फत Fourth signal ह्या CRR च्या मदतीने सफाळे येथील उंबरपाडा व रोडखडच्या महिलांकरिता कौशल्य प्रशिक्षण राबविले गेले,ज्याकरीता निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स विद्यार्थ्यांनी त्यांच्या दोन प्राध्यापकांसह सहकार्य केले. टाय अँड डाय, ब्लॉक प्रिंटिंग, फॅब्रिक प्रिंटिंग, फॅब्रिक ज्वेलरी आणि शिवणकाम यांचे प्रशिक्षण दिले. या मागील उद्देश महिलांनी हे कौशल्य शिकून रोजगार निर्मिती सुरू करावी हा होता.
Fourth signal ह्या CSR टीमने सख्य संस्थेच्या संचालिकासोबत प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या ठिकाणी व कपासे येथे भेट देवून महीलांसोबत चर्चा केली. आणि शाळांना भेट दिली जिथे मुलांनी पर्यावरणशास्त्र आणि लिंग भेदभाव यावर पथनाट्य सादर केले. ठाकूर पाडा गावात गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या मूल्यांची आठवण करून देण्यात आली, ज्यांनी ब्रिटीश नियमांविरुद्ध लढा दिला आणि अहिंसा, सत्य आणि अस्तित्त्व या मूल्यांसह संघर्ष केला.
या गावात – महिलांना स्वच्छताविषयक सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व समजावून सांगून त्यांचे वाटप करण्यात आले. उपजीविका कार्यक्रम राबविण्यास जर ह्या महिलाना कौशल्य शिकायचे असेल तर ही टीम त्यांना मदत करील असे ही त्यानी सांगितले, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.