
Headline-
चिंचोटी हद्दीतील सानिया स्टुडिओ जवळ सुमारे २५००० चौरस फूट रेती,विटाचे अनधिकृत बांधकाम उभे होत आहे.
वसई विरार शहरात सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागलेले आहेत.त्यामुळे झोपी गेलेले लोकप्रतिनिधी पुन्हा आपलं नावलौकिक निर्माण करण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत.नुकताच श्री राम प्राण प्रतिष्ठा उत्सव दिवाळी रूपाने शहरात पार पडला त्यामध्ये आम जनतेसोबत लोकप्रतिनिधी वर्गाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.आता निवडणूक येणार म्हणून मित्र मित्र असणारे कार्यकर्ते आप आपल्या पक्षा साठी काम करण्यात व्यस्थ होताना दिसतील. कोरोना काळातील लोकसेवा लोकप्रतिनिधी यांच्याकडून अपेक्षित होती परंतु त्यावेळी खरी लोकसेवी गरजू संस्थानी पुढाकार घेऊन आपली जबाबदारी पार पाडली. निवडणूक वेळी बस भरून बसवर खर्च करून लोकप्रतिनिधी आपण किती जनतेच्या उपयोगी येऊ हे भासवून देतात पण कोरोनाच्या अतिप्रसंगी लोकप्रतिनिधी गायब झालेले पाहायला मिळाले.त्यामुळे जनतेने स्वतः ठरवून आपला लोकप्रतिनिधी बनण्यासाठी योग्य कोण आहे हे सुनिश्चित करावे.
वसई विरार शहरातील अनधिकृत बांधकाम ही समस्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे त्यालाच अनुसरून प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामे जोमावर सुरू आहेत.कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहेत.प्रभाग जी च्या सहआयुक्त मनाली शिंदे या एकट्या ३ प्रभाग सांभाळून कार्यरत होत्या परंतु सध्या एक जी प्रभागातील अनधिकृत बांधकामे सहआयुक्त मनाली शिंदे थांबवण्यात अयशस्वी ठरताना दिसत आहेत.कनिष्ठ अभियंता कल्पेश कडवं यांच्या बदली नंतर जी प्रभागातील अनधिकृत बांधकामाची बंडलबाजी आता कनिष्ठ अभियंता तुषार माली आणि कनिष्ठ अभियंता अरुण सिंग यांच्या खांद्यावर आहे.याशिवाय छोट्या चाळी बांधकाम यांच्याशी लिपिक विजय नडगे यांच्याशी चांगले व घट्ट संबंध असल्याकारणाने चिंधी चाळी माफियांना पोसण्याचे काम लिपिक विजय नडगे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.जी प्रभागातील मोठ्याने होणारी बहुतेक अनधिकृत बांधकामे अतिरिक्त आयुक्त रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असतात.शिवाय आयुक्त अनिल कुमार पवार यांचीही प्रभाग जी हद्दीतील मोठ्या अनधिकृत बांधकामांना फूस असल्याचे जनतेत बोलले जात आहे.त्यामुळे जो तो भ्रष्टाचारी असल्याचे जनतेला कळून चुकले आहे.शहराचा आकार बशीचा असल्याचे स्पष्ट करून आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांना हिरवा कंदील दाखवला आहे.त्यामुळे अतिरिक्त आयुक्त ,उपायुक्त ,सहआयुक्त,कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी हे बांधकाम व्यावसायिकांच्या हाती विकले गेलेले आहेत.असे स्पष्ट होते.
प्रभाग जी हद्दीतील कुख्यात नावाजलेला विकासक रमजान कुरेशी हा सानिया स्टुडिओ जवळ सुमारे २५००० चौरस फूट इतके मोठे अनधिकृत बांधकाम उभारत आहे.याची माहिती जी च्या पालिका सहआयुक्त मनाली शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांना दिलेली असून सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई करण्यात आलेली नाही आहे.