
वसईत काँगेसची पक्षबांधणी बांधकाम माफियांच्या जीवावर?

काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे. वास्तविक एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना वसई विरार क्षेत्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यां कडून मात्र पक्षबांधणी ऐवजी पक्षाचीच प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.वास्तविक वसईत काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी वर्तक घराणे, कै मायकल फ़ुर्टयाडो तसेच अनेक दिग्गजांनी अतोनात प्रयत्न केले केले.परंतु सध्या केवळ पदासाठी पक्षात आलेल्या काही स्वार्थी पदाधिकाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर कृत्यांना खतपाणी घालून काँग्रेस पक्षाची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी चक्क पक्ष्याच्या प्रदेश अध्यक्षांसोबत केलेल्या फोटो सेशनचा आधार घेत अधिकारी वर्गावर दबावतंत्राचा अवलंब करण्यात येत आहे.शहजाद मलिक असे या काँग्रेस पदाधिकाऱ्याचे नाव असून कुख्यात बांधकाम माफिया छोटा शेहजाद(संजर हमीदुल्ला चौधरी) ची अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नावाचा गैरवापर करताना दिसत आहे.
दरम्यान काँग्रेस पदाधिकारी शहजाद मलिक च्या अश्या बेकायदेशीर कृत्यांचा निष्ठेने काम करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे याच काँग्रेस पदाधिकाऱ्याने पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाविरोधात पत्रव्यवहार करून पालिके विरोधात आंदोलने केली होती. परंतु या आंदोलनाचे पुढे काय झाले?किती अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली? हे अध्यापही गुलदस्त्यात आहे.त्यामुळे पालिकेविरोधात झालेली आंदोलने एक राजकिय स्टंटबाजी होती का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.दुसरीकडे पालिकेविरोधात आंदोलनाचा स्टंटबाजी करणाऱ्या याच पदाधिकाऱ्याकडून आता कुख्यात बांधकाम माफिया छोटा शेहजाद(संजर हमीदुल्ला चौधरी) ची अनधिकृत बांधकामे वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पक्षबांधणी करण्याऐवजी बेकायदेशीर कृत्यांना अभय देऊन कोंग्रेस पक्षाची प्रतिमा मालिन करणाऱ्या शहजाद मलिक विरोधात पक्षश्रेष्ठींनी वेळीच कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.