
वसुलीची रक्कम मंत्रालयापर्यंत पोहोचली
त्वरित निष्कासन कारवाई करून एमआरटीपी गुन्हा दाखल करा
२०० रुपये प्रती चौरस फूट प्रमाणे वसुली.
प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी हद्दीत वालीव बस आगाराच्या मागे भूमाफिया अशरफ खान याने हजारों फूट अनधिकृत बांधकामे केली असून सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करून एमआरटीपी गुन्हे दाखल करावेत.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी हद्दीत वालीव बस आगाराच्या मागे भूमाफिया अशरफ खान याने महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार, उपायुक्त किशोर गवस, प्र. सहा. आयुक्त मनाली शिंदे यांना मॅनेज करून २०० रुपये प्रती चौरस फूट प्रमाणे चढावा चढवून हजारों चौरस फूट अनधिकृत बांधकाम केले आहे. अशरफ खान याने या व्यतिरिक्त प्रभाग समिती जी तसेच एफ हद्दीत लाखों फूट अनधिकृत बांधकामे केली आहेत. अनधिकृत बांधकामधारकांकडून अधिकारी जी वसुली करतात त्यातील रक्कम मंत्रालयापर्यंत पोहोचविली जात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडूनच सदरच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले जात आहे.
सदरच्या अनधिकृत बांधकामांवर विना विलंब निष्कासनाची कारवाई करून एमआरटीपी गुन्हे दाखल करावेत.
अशरफ खान याच्या बांधकामांवर कारवाई केली जाईल असे प्रभाग समिती जी कार्यालयाकडून सांगितले जाते. मात्र कारवाई केली जात नाही. लाच खाल्लेली असल्यामुळे कारवाई करणार कशी असा प्रश्न आहे.




