
बाफाने येथील स्वयंघोषित समाजसेवक महापालिका प्रशासनाला नाचवतोय आपल्या तालावरती! अनधिकृत बांधकामातून मीपणा.
भ्रष्टाचार करा-भ्रष्टाचार करा’ हे ब्रीद वाक्य प्रभाग जी च्या अधिकाऱ्यांनी घेतले मनावर?(जी ची टीम- मनाली,अरुण,तुषार,सुनील,विजय,प्रमोद )
वसई विरार शहरात निवडणूकीचे वारे वाहू लागल्याने उत्साही लोकप्रतिनिधी पुन्हा नव्याने स्वतःची प्रचिती निमार्ण करण्यात तल्लीन झाले आहेत. नव नवी विकास कामे याबाबत सविस्तर माहिती गोळा करून शहराचा विकास करण्याचा हेतू साध्य करण्याच्या मार्गाने लोकप्रतिनिधींची वाटचाल सुरू झाली आहे.जनतेने स्वतः जबाबदारीने विचार करून आपल्या प्रश्नांवर कोण खरून उतरेल याबत ठरवलं पाहिजे.कारण निवडणूक तोंडावर वर आली की आम जनता लोकप्रतिनिधी च्या भोंगळ आमिषाना बळी पडत असते.रस्ते नाले तशीच विकास कामे सध्या जोर देत महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहेत .परंतु अनधिकृत बांधकाम या विषयाला अजूनही पालिका प्रशासन दुर्लक्षित करताना दिसत आहेत.त्यामुळे अनधिकृत बांधकाम ही समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.शिवाय जो तो खाऊन गप्प बसून खुर्ची गरम करत आहेत.यावरून स्पष्ट होत आहे.
महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिचुन बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे उभारत आहेत.पालिका अधिकाऱ्यांशी साटलोट करून बांधकाम माफियांनी आपला गोरख धंदा सुरू केला असून सिस्टीम मधील वरून खालपर्यंत सर्व खात असल्याचे त्यांच्याकडून सगळीकडे सांगितले जात आहे.त्यामुळे नवल असे की पालिका भ्रष्टाचार करण्यावर जास्त भर देते हे साध्य झालेले आहे.त्यामुळे पालिका आयुक्तांना आपली जबाबदारी ओळखून अनधिकृत बांधकामाबाबत आदेश जाहीर करणे गरजेचे झालेले आहे.तसेच आयुक्तांशी दफ्तरी भेट घेतली असता त्यांचं अनधिकृत बांधकाम ह्या विषयाबाबत त्यांचं बोट हे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्याकडे दाखवण्यात येते.त्यामुळे सम्पूर्ण अनधिकृत बांधकाम विषयाची खबरबात मनाले यांच्याकडे असून सुद्धा अधिकाऱ्यांच्या बदल्या घडवून आणण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई केली जात नाही याची खंत आहे.मनाले यांच्याकडून काडीमात्र कारवाई होण्याची अपेक्षा नसल्याने अर्जदारांमध्ये अस्वस्थ वातावरण आहे.मनाले यांच्या जोडीला उपायुक्त किशोर गवस असून त्यांनी गेले कित्येक वर्षे येथून आपली खुर्ची सोडलेली नाही.शिवाय किशोर गवस यांना वसई विरार महापालिका चांगलीच आवडलेली दिसत आहे.त्यामुळे त्यांना पुन्हा बदली देऊन वसई विरार महापालिकेत पदभार देण्यात आला होता.आयुक्त गंगाधर डी.यांच्या कार्यभाराच्या वेळी त्यांना कंटाळून स्वतः पदभार सोडून गेलेले रमेश आणि किशोर पुन्हा आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कार्यकाळात नियुक्त होण्यामागे नक्की कोणते समाजकारण असावे ह्याबाबत खूप सारे प्रश्न निर्माण करत आहेत.यांवर नक्कीच पुढील अंकात सविस्तर सांगण्यात येईल.
जी हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्ग बाफाने येथे रेल्वे ब्रिज जवळ सर्व्हे क्र ३९/२,४०,४२/२ या भूखंडावर एकूण चार लाख चौरस फूट एवढे मोठे इंडस्ट्रीयल अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे. येथे विकासाच्या नावावर स्वयंघोषित समाजसेवक अनधिकृत बांधकामे उभारत आहे.पैश्याच्या बळावर पालिका अधिकाऱ्यांना चायपाणी देऊन कारवाई करण्यासाठी आलेल्यानं उलट्या पायी परत पाठवण्यात येते.प्रभाग जी च्या सहआयुक्त मनाली शिंदे यांनी दोन वेळा याठिकाणी पाहणी केली असून दोन्ही वेळा याठिकाणी कारवाई करण्यात आलेली नाही.कनिष्ठ अभियंता तुषार माळी आणि कनिष्ठ अभियंता अरुण सिंग यांना याठिकाणी जाण्यास भीती वाटत असून याठिकाणी लिपिक सुनील टेलगुते यांना पुढे करून मिळेल ते फुल ना फुलाची पाकळी घेतली जात आहे.येथील स्वयंघोषित समाज सेवकाचे संबंध थेट अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्याशी असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांची गोची झालेली पाहायला मिळत आहे.तसेच आपल्या धुंदीत मस्त असणारे चिंधी चोर लिपिक विजय नडगे चाळी बांधकाम करून जे मिळेल त्यात खुश आहेत पण आता सध्या या छोट्या चाळी बांधकामात लिपिक सुनील टेलगुते ही हिस्सा मागत असल्याने विजय नडगे निराश असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.