
विरार/प्रतिनिधी-ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभागातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याच्या ठपका ठेवून ठाणे महापालिका प्रशासनाकडून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या वादग्रस्त सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांना शासनाने वसई विरार पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले आले आहे.दुसरीकडे सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या सारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या वादग्रस्त अधिकाऱ्याची वसई विरार पालिकेत वर्णी लागल्याने वसई विरार मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांचा ठाणे महापालिकेतील कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. ठाणेकर यांना ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीची जबाबदारी सोपविण्यात आली होती.परंतु कळवा प्रभाग समितीत कार्यरत असताना
सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.शिवाय
ठाणे मनपाच्या कळवा प्रभागातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी भाजपचे आमदार संजय केळकर तसेच स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नागपूर येथील अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडत सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.याच लक्षवेधीवर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे तसेच अशा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले होते.त्याचबरोबर अशी बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही संकेत त्यांनी दिले होते.मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी निलंबनाऐवजी सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचे सोपस्कार पार पाडले होते.दरम्यान सहा.सक्तीच्या रजेवर असलेले सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर वसई विरार पालिकेत प्रतिनियुक्तीवर रुजू झाले असून प्रभाग समिती आय तसेच ई प्रभागाचा अतिरिक्त पदभारही सोपविण्यात आला आहे.