
मागूर्ली पाड्यातील बांधकाम व्यवसायिकांसमोर प्रभाग जी च्या अधिकाऱ्यांनी गुडघे टेकले आहेत
गाव मौजे राजीवली येथील सर्वे क्र १२३,१२४,१२५ मागूर्ली पाडा याठिकाणी नव्याने अनधिकृत बांधकामे उभी राहत असून महापालिका प्रशासन मात्र आपली भूमिका स्पष्ट करत नसून येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यापासून टाळा टाळ करत आहे.रीतसर अर्ज देऊन सुद्धा प्रभाग जी चे अधिकारी सुस्त कारभार चालवत आहेत.प्रभाग जी च्या सहआयुक्त मनाली शिंदे यांनी आपल्या डोळ्यावर काळी पट्टी बांधल्याने त्यांना कोणत्याही प्रकारच सोयर सुतक उरलेले नाही.सम्पूर्ण विषय आपल्याला माहीत असून लवकरच कारवाई होईल अशी भाकड आश्वासन प्रभाग जी च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येतात परंतु परिणामी कारवाई मात्र शून्य होत असल्याचे दिसून येत आहे.या गेल्या सात दिवसात मागूर्ली पाडा याठिकाणी सुमारे १५ ते २० रूम-गाळे अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.त्यामुळे असेच चालू राहिले तर येणाऱ्या १ महिन्यात याठिकाणी अनधिकृत बांधकामे बखास झालेली पाहायला मिळतील हे नक्की झाले आहे.


