


लिपिक सुनील टेलगुते आणि लिपिक विजय नडगे यांच्यात बिरबलाची खिचडी शिजतेय
शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा लावण्याऐवजी पालिका प्रशासन अनधिकृत बांधकामाच्या मुळाला पाणी घालण्याचं काम पार पाडत आहे.अनधिकृत बांधकाम ही समस्या शहराला काँक्रीटच्या जंगलात रूपांतर करीत आहे.वसई विरार शहरात बहुतांश वन विभागच्या आणि आरक्षित भूखंड बांधकाम व्यवसायिकांडून गिळंकृत करण्यात आलेले आहेत.याची कोणतीही खबरदारी न घेता भ्रष्टाचाराचे धोरण अवलंबून पालिका अधिकारी विकले गेलेले आहेत.महापालिका महसूल दृष्टीने अनधिकृत बांधकामे होणे आवश्यक आहे परंतु दलाल पालिका अधिकारी पालिकेचा महसूल स्वतःच्या खिश्यात टाकून मोकळे झालेले आहेत.त्यामुळे शहराचा विकास खुंटीला लागला आहे.तसेच आयुक्त अनिल कुमार पवार नेहमी अनधिकृत बांधकाम या विषयांकडे पाठ फिरवतात त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले त्यांच्या गैरहजेरीत हेरा फेरी करत बसतात.अशी कुजबुज जनतेत सुरु आहे.
प्रभाग जी मधील अनधिकृत बांधकामामध्ये अतिरिक्त आयुक्त यांच्या भागीदारीचा वाटा असल्याचे मागील वृत्तात प्रसिद्ध केले गेले होते.त्याला अनुसरून आजही अतिरिक्त आयुक्त जनाची ना मनाची लाज न राखता ‘जैसे थे’ मनमानी कारभार अजूनही चालवत आहेत.आम्ही दिलेल्या तक्रारी नुसार मुबंई अहमदाबाद महामार्गावरील बाफाने येथील रेल्वे ब्रिज जवळ मोठ्या संख्येने अनधिकृत इंडस्ट्रीयल बांधकाम सुरू असून लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.पण अतिरिक्त आयुक्तांना वरील ठिकाणी कारवाई करण्यात काडीचा रस नसल्याचे उमजून आले आहे.त्यामुळे त्यांच्या अश्या वागण्याने असे साध्य होत असावे की,रक्कम वसूल झालेली आहे त्यामुळे मुद्दामून या विषयांवर दुर्लक्ष केले जात आहे.अतिरिक्त आयुक्तांच्या प्रवृत्ती मुळे बाकी इमानदार पालिका अधिकारीही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या अमिषात अडकत चालले आहेत.वरील ठिकाणी स्वयंघोषित समाजसेवक विख्यात विकासक आपण वर पर्यत पैसे चारतो असे छाती ठोक पणे सगळीकडे सांगत फिरत आहे.येथील विकासकाचे दोन खास फॅन्टर आहेत.एक विजय नडगे तर दुसरा लिपिक सुनील टेलगुते हे दोघे आहेत.बाकी पालिका अधिकारी वर्गाशी मतलब न ठेवता डायरेक्ट अतिरिक्त आयुक्तांना हे दोघे रिपोर्ट देतात अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.मोठं मोठ्या अनधिकृत बांधकामाची वसुली करून सुद्धा लिपिक विजय नडगे आणि लिपिक सुनील टेलगुते यांना चाळीची ही बांधकाम वसुली हवी असते.म्हणतात ना ते भिकार्याला सोन्याचं भांड दिले तरी तो भिकच मागणार अशी काहीशी गत आहे.अतिरिक्त आयुक्तांनी सहआयुक्त मनाली शिंदे यांना खेळण्यातील बाहुली बनवून सर्व कारभार विजय आणि सुनील यांच्या खांद्यावर दिला असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.
संदर्भ–
जी हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्ग बाफाने येथे रेल्वे ब्रिज जवळ सर्व्हे क्र ३९/२,४०,४२/२ या भूखंडावर एकूण चार लाख चौरस फूट एवढे मोठे इंडस्ट्रीयल अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे