वसई ( प्रतिनिधि ) :- आज दिनांक 17 फरवरी 2024 शनिवार रोजी सकाळी 10 तेसायंकाळी5 वाजे पर्यंत गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप संस्था चे संस्थापक /अध्यक्ष : मा. श्री. जेरी मच्याडो आणि पालघर जिल्हा अध्यक्ष : श्री. आसिफ नासिर शेख, तसेच श्री. जितेंद्र शिरसाठ (उपाध्यक्ष), श्री.चंद्रकांत कोलते (कार्याध्यक्ष), श्रीमती. जॉर्जिया शिकवेरा (सचिव), श्रीमती. संगीता भोईर (महासचिव), श्री. रॉकी करवालो (खजिनदार) व गरीब जनतेचा संपूर्ण टीम तर्फे वसईतील जनतेचा मांगणीनूसार दुसऱ्या वेळी मोफत शिबिर ठेवण्यात आला होते. सदर शिबिर मध्ये मोफत आयुष्मान भारत कार्ड, आबा कार्ड, इलेक्शन कार्ड व मुख्यमंत्री वयोश्री योजना ६५ वरील चे नागरिकांना पेन्शन योजना असा मोफत शिबिर भास्कर अली, वसई पश्चिम येथे ठेवण्यात आला होते. सदर शिबिरात भरपूर वसईकरांनी लाभ घेतलं व पुढे पण गरीब जनतेचा आवाज शोसल ग्रूप तर्फे असेच कार्यक्रम नेहमी जनतेच्या सोईसाठी करावे व लोकांसाठी कॅम्प आणि असे विविध योजना आणावे असा लाभार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. सदरचे कार्यक्रम हे मा. विजय पाटील, ( विजय पाटील फाऊंडेशन) आणी मा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आला होता.
सदरचे शिबिरा मध्ये पाहुणे म्हणून वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस चे मा. उपाध्यक्ष ,फिरोज इब्राहिम खान, आम आदमी पक्षाचे पालघर जिल्हा प्रभारी वैभव खेडेकर व वसई तालुका प्रभारी इग्निस डीमेलो आणी शिवसेनाचे जेष्ठ नेते मा. मिलिंद खानोलकर व महिला नेत्या मा. नयना वर्तक तसेच भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष मुबीन कॉल, भारतीय जनता पार्टीचे प्रतीक चौधरी उपस्थित होते. तसेच सर्व मान्यवर व पत्रकार यांना शाॅल ओढून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वसईतील पत्रकार मधिल वसई विकास प्रेस तर्फे शहनाज शेख मॅडम, मेमन फास्ट न्यूज तर्फे रफिक मेमन, जुलूम से जंग न्यूज तर्फे नजीर मुलानी व अनेक मान्यवर पत्रकार आणी समाजसेवक सदर कार्यक्रमात उपस्थित होते… सदरच्या कार्यक्रमात टोटल 400 मुख्यमंत्री वयोश्री पेन्शन योजना, 300 इलेक्शन कार्ड वोटर आयडी, 1200 आयुष्मान भारत कार्ड लोकांनी लाभ घेतला . कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाला. गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप तर्फे सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले व कार्यक्रमात काम करून व फाॅम भरून लोकांना सहकार्य केल्याबद्दल सर्वाचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *