
प्रभाग समिती आय हद्दीत होळी परिसरात रमेदी, घोगाळेवाडी येथे मौजे सांडोर सर्वे नं ९९/३/१ या जागेवर ४ बंगल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस यांनी नोटीशी ला उत्तर देताना सांगितले आहे की सदरची मालमत्ता अनधिकृत बंगल्यासह मूळ जमीन मालकांकडून खरेदी केली आहे.
एकीकडे पालिका प्रशासन नागरिकांना घर खरेदी करताना पालिकेच्या नगररचना विभागकडे शहानिशा करण्याचा सल्ला देत असताना सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस हे स्वतः पालिकेत अधिकारी असताना अनधिकृत बंगले
असलेली मालमत्ता कशी खरेदी केली.
विशेष म्हणजे पालिका प्रशासनाच्याच भाषेत बोलायचे झाले तर सदरची मालमत्ता अनधिकृत असताना संबंधित जमीन मालकावर आजपर्यंत नियमानुसार गुन्हा का दाखल झाला नाही.
मध्यंतरी पालिकेच्या प्रभाग समिती ई द्वारा विकासक, जमीन मालक इमारती बांधून फरार झाल्याने सदनिका धारकांना एमआरटीपी कायद्यानुसार नोटिसा जारी करून इमारती तोडण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.
आता सदरचा नियम सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस यांच्या बेकायदेशीर बंगल्यासाठीही पालिका आयुक्तांनी लागू करावा.
टीप – जागा मालक हे पत्रकार असून त्यांचे मोबाईल जप्त करून बाहेर ठेवण्यात आले आणि हिंदू मुस्लिम ची भाषा करण्यात आले, मात्र सह आयुक्त गिल्सन यांच्या लक्षात नाही त्यांच्या कडे छुपा कॅमेरा मध्ये हे गोष्ट कैद करण्यात आले आणि जागा मालकाला दाबण्याचा प्रयत्न महसूल ची जागा सांगून अनधिकृत बांधकाम वर तोडक कारवाई नाही.