मालकीविषयीची कागदपत्रे :
यामध्ये आपण कसत असलेली जमीन ही आपल्या मालकीची कशी झाली हे दाखविणारी कागदपत्रे मूळ स्वरुपात प्रत्येक शेतकर्‍याने आपल्याकडे ठेवली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: खरेदीचा दस्त, बक्षीसपत्राचे दस्त, मृत्युपत्र, किंवा अन्य स्वरुपाचा मूळ दस्तऐवज यांचा समावेश होतो. जर वडीलोपार्जित जमीन नावावर आली असेल तर प्रत्येक शेतकर्‍याने एका कोर्‍या कागदावर वंशवेल लिहून काढला पाहिजे. त्यामध्ये आजोबांचे नांव, त्यांना असणारी एकूण मुले व मुली, त्यांच्या मृत्युनंतर झालेल्या वारसाच्या नोंदी, कायद्यानुसार आलेला हिस्सा व त्यानुसार किती जमीनीपैकी किती क्षेत्र आपल्या नावावर झालेले आहे हे शेतकर्‍याला समजले पाहिजे. यामध्येच सर्व वारसांच्या नोंदी, फेरफार नोंदीचे उतारे, वारस ठरावाचे उतारे लावावेत.

7/12 उतारा :
आपल्या हक्काची नोंद दरवर्षी योग्यरित्या केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांने दरवर्षी आवर्जुन 7/12 च्या उतार्‍याची नक्कल घेऊन मूळ फाईलला लावली पाहिजे. जमीन मालकीची झाल्यापासूनचे सर्व 7/12 उतारे या फाईलमध्ये लावल्यास शेतकर्‍याच्या नवीन पिढीलादेखील आपले हक्क समजण्यास मदत होईल.

जमीन मोजणीचे नकाशे :
ज्या ज्या जमीनी आपल्या मालकीच्या अगर वहिवाटीच्या आहेत, अशा जमीनीच्या मोजणीचे नकाशे प्रत्येक शेतकर्‍याजवळ असणे आवश्यक आहे. शेजारच्या शेतकर्‍याने अतिक्रमण केल्यानंतर ऐनवेळी धावपळ करुन किंवा अर्जंट मोजणीची फी भरुन गरजेनुसार जमीन मोजण्यापेक्षा आपल्या सर्व जमीनी एकदा रितसर मोजून त्यांचे नकाशे आपल्याजवळ ठेवणे शेतकर्‍याच्या हिताचे आहे.

जमीनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे :
शासनामार्फत जमाबंदी करतांना राज्यातील सर्व जमीनी मोजण्यांत आल्या असून त्यांचे मोजमाप या टिपण पुस्तकात नोंदविलेले असते. आपल्या मालकीच्या जमीनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे तालुका निरिक्षक, भूमी अभिलेख (मोजणी खात्याच्या कार्यालयाकडून) प्राप्त करुन घेऊन आपल्या मूळ फाईलला लावावेत. या नकलांमुळे जमीनीचे एकूण क्षेत्रफळ, लांबी, रुंदी समजण्यास शेतकर्‍याला मदत होईल.

8अ चा उतारा :
आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय. जमीन जर खरेदीची असेल तर, खरेदी तारखेनंतर घेतलेला 8अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8अ चा उतारा फाईलला लावावा. जमीन जर वडीलोपार्जित चालत असलेली असेल तर वडील हयात असतांना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आजरोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दाखविणारे दोन्ही 8अ चे उतारे प्राप्त करुन घेऊन फाईलला लावले पाहिजेत.

इतर हक्कातील नोंदीविषयक कागदपत्रे :
आपल्या मालकीच्या कोणत्याही जमीनीबाबत इतर हक्कांमध्ये काही नोंदी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे शेतकर्‍यांनी मूळ फाईलमध्ये लावली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: सोसायटीच्या कर्जाच्या बोजाच्या नोंदी ज्या “ई” करारपत्राच्या आधारे करण्यांत त्या “ई” करारपत्राचा नमुना, किंवा बँकेचे कर्ज घेतलेले असल्यास गहाणखताची प्रत इत्यादींचा समावेश होतो. जमीनीमध्ये हक्क सांगणार्‍या काही व्यक्तिंची नांवे इतर हक्कात असल्यास ती नोंद कशाच्या आधारे आली हे सांगणारी कागदपत्रे मूळ फाईलला लावणे आवश्यक आहे.

जमीन महसूलाच्या पावत्या :
दरवर्षी जमीन महसूल भरल्यानंतर तलाठयामार्फत दिल्या जाणार्‍या पावत्या हा एक कायद्याच्या ञ्ृष्टीने अतिशय महत्वाचा पुरावा मानला जातो. हा पुरावा शेतकर्‍याने व्यवस्थित सांभाळून व अद्यावत स्वरुपात ठेवला पाहिजे.

घराच्या मालकी हक्काबाबतचे रेकॉर्ड :
शेतकर्‍याने शेतात किंवा अन्यत्र घर बांधले असेल तर त्या घराच्या बाबतीत मिळकतीचा उतारा, खरेदी पत्र, घरपट्टी भरल्याच्या पावत्या इत्यादी महत्वाची कागदपत्रे देखील या फाईलमध्ये लावावीत.

पूर्वीचे खटले व त्या विषयीची माहिती :
स्वत:चे हितसंबंध असणार्‍या सर्व जमीनींच्या बाबतीत पूर्वी कोणतीही केस कोणत्याही कोर्टात चालली असेल तर अशा केसची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र, इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवली पाहिजेत.

इतर कागदपत्रे :
या शिवाय शेतकर्‍याच्या जमीनीचा ज्या ज्या ठिकाणी संबंध येतो, त्या संदर्भात जो कागदोपत्री व्यवहार केला असेल, त्या संबंधीची सर्व कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे. यामध्ये तगाई माफीचे आदेश, सारा माफीचे आदेश, नवीन शर्तीने जमीन दिली असल्यास त्याबाबतचे आदेश, भूसंपादनाची नोटीस, कृषी गणनेच्या वेळी दिलेली माहिती, किंवा अन्य महत्वाची कागदपत्रे यांचा समावेश होतो.

अशा तर्‍हेने जर प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या जमीनीचे रेकॉर्ड ठेवले तर, प्रत्येक शेतकर्‍याला व त्यांच्या मुलांनादेखील आपले जमीनविषयकहक्क अधिक चांगल्या दृष्टीने समजून घेता येती दृष्टीनेनेत्ते मधील भांडणे कमी होण्याला मदत होईल. शिवाय ऐनवेळी कोणतीही कागदपत्रे मिळवण्यासाठी फारशीधावपळ करावी लागणार नाही. पिढयानपिढया कष्ट करणार्‍या शेतकर्‍याला सुध्दा आपल्या नावावर कोणकोणते गट नंबर आहेत, त्यापैकी कोणत्या गटावर कर्जकाढलेले आहे, कोणता गटनंबर कूळ कायद्याच्या वादात अडकलेला आहे असा फरक कळून येत नाही. जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड वरीलप्रमाणे अद्यावत ठेवल्यास त्याच्याहिताचे संरक्षण होण्यास निश्चितपणे चांगली मदत होऊ शकेल.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *