(चौधरी कम्पाउंड वाकनपाडा येथील अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून मजुराचे दुःखद निधन)

महापालिका अनधिकृत बांधकामे उभी होईपर्यंत झोपेचे सोंग घेऊन मूग गिळून गप्प असते हेचं खरं(मूग – पैसे)

संदर्भ
जी हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्ग बाफाने येथे रेल्वे ब्रिज जवळ सर्व्हे क्र ३९/२,४०,४२/२ या भूखंडावर एकूण चार लाख चौरस फूट एवढे मोठे इंडस्ट्रीयल अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे

वसई विरार शहरातील वाढत्या स्थलांतरामुळे घरे आणि व्यवसायिक मागणी यामुळे शहराला आर्थिक दृष्टीने फायद्याचं ठरत आहेत.परंतु विकसिलता वाढीस येण्यासाठी शहरात भरमसाठ अनधिकृत बांधकामे उभी राहून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होऊ लागली आहेत.महत्त्वाचे म्हणजे अनधिकृत बांधकामे अतिशय कमी दरज्याच्या कच्चा माल वापरून उपद्रव सुरू करण्यात येत आहेत.शिवाय पालिकेला कोणतेही सोयर सुतक नसल्याने ते फक्त स्वतःचा आर्थिक फायदा करण्यात व्यस्थ आहेत.नुकतेच वाकणपाडा या ठिकाणी अनधिकृत बांधकामाची भिंत पडून मजुरांपैकी एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी स्वरूपात असून एपेक्स रुग्णालयात उपचार चालू असल्याचं सांगण्यात आलं आहे.त्यांना भेटण्यासाठी पत्रकार आणि लोकप्रतिनिधी वगळता त्यांचा चालकमालक आणि ठेकेदारही फिरकलेला नाही अशी माहिती मिळाली आहे.ही दुर्दैवी घटना घडल्या नंतर सहआयुक्त मनाली शिंदे यांच्याकडून आपल्याला याबाबत काही कल्पना नसल्याचे सांगण्यात आले.तसेच याआधी अधिकारी वर्गाणी पाहणी केली फक्त लितापोती करण्याचे काम सुरु असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमा मध्ये दिली आहे.त्यामुळे सदर बांधकाम सहआयुक्त यांना आधीपासूनच माहीत असल्याचं नाकारता येणार नाही.सध्या सहआयुक्त यांच्या डोक्यावर खापर फोडण्याची तयारी उपायुक्त किशोर गवस यांच्याकडून सुरू आहे.तरी सुद्धा गेलेली अब्रू मिळवण्यासाठी सहआयुक्त मनाली शिंदे एफ हद्दीत कारवाई घडवून आणत आहेत असे सूत्रांकडून समजलं आहे.

आतापर्यंत वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामांमुळे अनेक बळी पडले आहेत.तरीसुद्धा महापालिका प्रशासनाचे डोके ठिकाणावर येत नसल्याचे दिसून येत आहे.भ्रष्टाचारी आयुक्त रमेश मनाले यांना कोण्याच्या जीव जाण्याने काडीमात्र फरक पडत नाही त्यांना फक्त त्यांच्या प्रति चौरस फूट रेट पासून मतलब आहे.अश्या मतलबी आयुक्तामुळे शहरात अनधिकृत बांधकाम ही गंभीर समस्या मोठ्याप्रमाणात उदयास येऊ लागली आहे.अश्या लालची आयुक्त रमेश मनाले यांच्या भोंगळ कारभारामुळे भविष्यात आम जनता सोयीसुविधांपासून वंचित राहणार असल्याचं जाणकारांचे मत आहे.वाकन पाडा येथील घटने नंतर उपायुक्त किशोर गवस यांना बळीचा बकरा बनवून मलई खाऊन सुद्धा एफ हद्दीत थोडीशी का होईना पण कारवाई करण्यास भाग पाडण्यात आले.सोबत सहआयुक्त मनाली शिंदे आणि उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या उपस्थिती मुळे बांधकाम धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले.कारवाई चा एवढा मोठा गाजावाजा करून सुद्धा फक्त पन्नास हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम चुटुक मुतुक तोडून स्वतःला इमानदार साबीत करण्याचा केवळीवाना प्रयत्न पालिकेकडून करण्यात आला.सहआयुक्त मनाली शिंदे यांच्या स्वतःच्या कार्यलयीन जी प्रभाग हद्दीतील अनधिकृत बांधकामे त्यांना दिसेनाशी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक त्यांना नाही करता येत आहे पण त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या का दिल्या जातात यामागे गुढ कायम आहे.जी हद्दीतील अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने सुरू असून त्यांची मलई वसुली करण्याचा कार्यक्रम लिपिक विजय नडगे यांच्यावर सोपवण्यात आला आहे.सध्या प्रभाग जी मध्येही अनधिकृत बांधकामे जोमात सुरू असल्याने वाकणपाडा सारखा प्रसंग घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय परिणामी भविष्यात काही घटना घडली तरी दलाल आयुक्त रमेश मनाले ,उपायुक्त किशोर गवस ,सहआयुक्त मनाली शिंदे आणि विजय नडगे मृतांची अंत्ययात्रा काढायला कमी करणार नाहीत त्यासोबत अंत्ययातत्रेत खांदा देऊन स्वतःचा गौरव करून घेण्यात अतिघाई करतील अशी ठिकठिकाणी चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *