खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सोबत रेल्वे अधिकारी उपस्थित राहणार

वसई : बोरिवली ते विरार दरम्यान 5 व्या व 6 व्या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी भूसंपादन केले जाणार असून यामध्ये 5 गावे बाधित होणार आहेत. रेल्वेकडून येथे 5 व 6 क्रमांकाची मार्गिका टाकली जाणार असून 30 ट्रॅकचे यार्ड तयार करण्यात येणार आहे. रेल्वेकडून अधिसूचना जारी केल्यानंतर याबाबतीत अनेक संभ्रम, समज-गैरसमज तयार केले जात आहेत. बाधित गावातील नागरिक यामुळे तणावात असून नागरिकांची भूमिका तसेच त्यांची मागणी व समस्या जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘रेल्वे परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार, 7 मार्च 2024 रोजी विश्वकर्मा हॉल, आनंद नगर, वसई (प.) येथे सकाळी 10.30 वाजता सर्व बाधित परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उत्तम कुमार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *