
वाढवण बंदर विरोधी समितीचे सन्माननीय राहुलजी गांधी यांना निवेदन
केंद्रीय प्रवक्ते तथा केंद्रीय माजी पर्यावरण मंत्री श्री. जयरामजी रमेश यांनी पत्रकारांना संबोधित करताना काँग्रेस पक्ष वाढवण बंदर विरोधात आणि स्थानिक मच्छीमार बांधवांच्या सोबत कायम.
शेतकऱ्यांना एमएसपी प्रमाणे हमीभाव त्याच प्रमाणे जंगलात उत्पन्न घेणाऱ्या आदिवासी बांधवांनाही एमएसपी प्रमाणे मालाचे हमीभाव
जल, जंगल, जमीन वर आदिवासी बांधवांचे अधीकार
आदिवासी बांधवांना संविधानातील सहाव्या अनुसूचीतील अधीकार परत देणार.


पालघर (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचा खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्च रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार येथे दाखल झाली. तदनंतर 14 मार्च रोजी पालघर जिल्ह्यातील तालुका मोखाडा येथे दाखल झाली असता , 15 मार्च रोजी सकाळी आठ वाजता सदर भारत जोडो न्याय यात्रेला तालुका मोखाडा येथून प्रारंभ झाला. प्रचंड गाड्यांचा ताफा आणि लाखोच्या संख्येने लोकांनी राहुल गांधी यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी केली होती. न्याय यात्रेचा ताफा तालुका मोखाडा मार्गे , तालुका जव्हार मार्गे , विक्रमगड मार्गे , वाडा येथे पोहोचले असता खंडेश्वरी नाका येथे रखरखत्या उन्हात राहुल जी गांधी यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित केले.
यावेळी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने राहुलजी गांधी यांना निवेदन दिले असता, वाढवण बंदराला कायम विरोध असल्याची पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच पत्रकार परिषदेस केंद्रीय प्रवक्ते तथा केंद्रीय माजी पर्यावरण मंत्री श्री. जयरामजी रमेश यांनी पत्रकारांना संबोधित करताना काँग्रेस पक्ष वाढवण बंदर विरोधात आणि स्थानिक मच्छीमार बांधवांच्या कायम सोबत असल्याचे सांगितले.
मोखाडा , जव्हार , विक्रमगड आणि वाड्यातील जनतेला संबंधित करताना देशात फक्त तीन टक्के असलेल्या लोकांच्या हातात न्यायव्यवस्था, मीडिया , पैसा व कॉर्पोरेट असून, देशातील 88 टक्के लोकांना प्रभूचे गुणगान करावे व उपाशी मारावे असे सांगीतले जात असल्याचे आरोप राहुलजी गांधी यांनी केले. घर असो किंवा कार्यालय महिला कठोर परिश्रम करण्यापासून कधीच मागे हटत नाहीत. त्यांच्या परिश्रमाला काँग्रेसच्या गृहलक्ष्मी न्याय हमीचा सलाम आहे. भावी पिढीच्या संगोपनासाठी स्री नारी शक्तीचा संपूर्ण देश आभारी आहे. वर्षाला एक लाख रुपयाची रक्कम त्यांना केवळ बळकट करणार नाही तर एकाच वेळी गरीबी पण दूर करेल.आज आपल्या देशात जनतेची 24 तास चोरी होत असून जनता फक्त मान हलवत बसली आहे, अग्निविर सारख्या योजना आणून तरुण युवकांच्या डोळ्यात रोजगार आणि नोकरीच्या नावाने धुळ फेकण्याचे काम विद्यमान सरकारने केले आहे. 88 टक्के लोकसंख्येला सरकार जुमानत नाही. देशातील सर्वोच्च न्यायालयात 650 न्यायाधीश असतानाही वर्षानुवर्ष खटले सुरू आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी हे इथले मूळ रहिवासी असून , त्यांच्या जागा मूठभर उद्योजकांनी घेतल्या आहेत. परंतु आमचे सरकार आल्यास सहा महिन्याचे आत आदिवासी बांधवांच्या जमिनी त्यांच्या पुन्हा ताब्यात देण्याची हमी राहुलजी गांधी यांनी दिली. तसेच वनखात्याच्या जमिनी जंगल व जमिनी यांच्यावर फक्त आदिवासींचा अधिकार राहील याचीही हमी व आत्मविश्वास राहुलजी गांधी यांनी उपस्थित जनतेला दिली. वन हक्क कायदा आम्हीच आणला होता. परंतु केंद्र सरकारने त्यात बदल केल्याने अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत. परंतु काँग्रेसचे सरकार आल्यास सहा महिन्यांमध्ये तक्रारी दूर करून वनखात्याच्या जमिनी , जंगल व जमिनीचा अधिकार आम्ही तुम्हाला परत देणार असल्याचेही राहुलजी यांनी प्रतिपादन केले. भाजपा सरकार जल,जंगल, जमीन आदिवासी बांधवांकडून हिरावून घेत आहे ते आम्ही आदिवासी बांधवांना परत देणार व त्यासाठी संविधानातील सहाव्या अनुसुचितील अधिकार आम्ही परत आणणार. शेतकऱ्यांना एमएसपी चे भाव आम्ही देणार आहोत. तसेच हमीभाव जंगलामध्ये उत्पन्न घेणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांना आम्ही देणार आहोत असे राहुल जी गांधी यांनी आदिवासी बांधवांना संबोधित करताना सांगितले.
यावेळी भारत जोडो न्याय यात्रेत राहुलची गांधी यांना ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या यात्रेत लक्षणीय प्रचंड गाड्यांचा ताफा सहभागी झाला होता. दुपारनंतर राहुल गांधी यांनी आलेल्या शिष्टमंडळांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून प्रश्न तडीस नेण्याचे आश्वासित करून भारत जोडो न्याय यात्रेचा ताफा वाडा भिवंडी मार्गे मुंबई कडे रवाना झाला. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोखाडा ,जव्हार , विक्रमगड, वाडा येथील शहराच्या मुख्य ठिकाणी तसेच राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मुख्य रस्त्याला जागोजागी प्रचंड गर्दी केली होती.