
पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून या क्षेत्रामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने व या क्षेत्रामध्ये परेश सुकूर घाटाळ हे अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेमार्फत सतत लढा देत असल्याने व सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवीत असल्याने यांना आदिवासी समाजाचा व स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा असल्याने बहुजन महापार्टी तर्फे पालघर लोकसभा क्षेत्रासाठी परेश सुकूर घाटाळ यांना उमेदवारी देणेबाबत पक्षाच्या पदाधिकारी यांनी सहमती दर्शवली आहे त्यामुळे बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान यांनी पालघर लोकसभा क्षेत्रासाठी बहुजन महापार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री.परेश सुकूर घाटाळ यांच्या नावाची घोषणा करून बहुजन महापार्टीचा फॉर्म A व B परेश सुकुर घाटाळ यांना देऊन यांची उमेदवारी जाहीर केली आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परेश सुकूर घाटाळ यांनी सांगितले आहे की महागाई, भ्रष्टाचार गरीबांवर होणारे अन्याय व आदिवासी समाजावर आतापर्यंत झालेले अन्याय याबाबतचा मुद्दा घेवून व ईव्हीएम चा मुद्दा घेवून मी निवडणुकीच्या प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले आहे