
वसई प्रतिनिधी : फाल्गुन पोर्णिमा निमित्ताने गौतमनगर निर्मळ गावात भाषा संस्कृती दिवस प्रत्येक वर्षी पोर्णिमेचे औचित्य साधून उत्साहात कार्यक्रम साजरा केला जातो. या वर्षी सुध्दा भाषा संस्कृती दिवस उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रम सायंकाळच्या वेळेत घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरूवातीस बौद्ध वंदना येण्यात आली. गाणे गाऊन व फाल्गुनी पोर्णिमेचे महत्त्व पटवून समस्त ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण केला गेला. गावचे सेक्रेटरी हरेश गणपत मोहिते यांनी सर्व ग्रामस्थ व महिला तसेच पदाधिकारी यांचे शब्दसुमनाणि स्वागत केले सदर कार्यक्रमाचा उद्देश असा की वसई पश्चिम पट्यातील अनेक समाजातील गावे आहेत पण प्रत्येकांची बोळी भाषा हि वेगळी आहे प्रत्येक समाज हा आपली भाषा व संस्कृती जपत असतो त्यामुळे गौतमनगर निर्मळ व पश्चिम पट्यात अशी नऊ गावे वसलेली आहेत यांची भाषा संस्कृती सुध्दा एक पारंपारिक आहे म्हणून वरिष्ठांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम हा दर वर्षी उत्साहात पार पडत असतो आपली बोळी भाषा बोळली जाते भाषेतील अर्थ समजावला जातो सदर दिवशी एकमेकांन बोळी भाषा बोलुन आनंद लुटला जातो. याचे कारण असे की आताच्या पिढीला आपली भाषेबद्दल माहिती पाहिजे व बोलता आली पाहिजे हा उद्देश आयोजकांनी डोळ्यासमोर ठेऊन सदर कार्यक्रम केला जातो. गावातील अनेक ग्रामस्थ कार्यक्रमात उपस्थित होते गावचे अध्यक्ष मंगेश क. मोहिते, खजिनदार : राकेश चं. चव्हाण, सेक्रेटरी : हरेश ग. मोहिते, सहसेक्रेटरी : अनंत मो. चव्हाण, सहखजिनदार : अश्विनी नि. मोहिते, विभाग प्रमुख : नितिन ज. मोहिते, मनोज बा.मोहिते, वरिष्ठ कार्यकर्ते : मोरेश्वर चव्हाण, रघुनाथ मोहिते, नरेश तांबे, व महिला मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.