
नालासोपारा (एस. रेहमान शेख ) तुळींज पोलीस स्टेशन मध्ये दिनांक २५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता तक्रारदार नेहा शेख यांनी आरोपी सलीम यांच्यावर गुन्हा दाखल केले आहे.
साईबाजार येथील आरोपी सलीम यांचा नेहाचे सासु यांच्याशी पैशाचा व्यवहार असुन आरोपी सलीम हा नेहमी पैसे मागण्यासाठी घरी येत असे .तिला एकटीला पाहून तिच्या सासुला व पतीला शिवीगाळी करुन मारण्याची धमकी देत असे ..
दि. 25/03/2023 रोजी सायंकाळी 5.30 वा सुमारास रहमतनगर येथुन नेहा सासुच्या घरी साईबाजार रोडवरती जात असताना सलीम हा रोडवरती भेटला आणि म्हणाला तेरी सास पैसे नहीं दे रही है, तेरी सास की पैसे देणे की औकात नही हे तु मेरे साथ सोजा असे अश्लील बोलु लागला तेंव्हा नेहाचे म्हणणे होते तुला मी ओळखत नाही, तुझा माझे सासुचा आणि तुझा व्यव्हार काय आहे ते तु पाहुन घे असे बोलुन नेहा तेथुन निघुन जात असतांना सलीम ने छातीला हात लावुन धक्का दिला तेंव्हा ती खाली पडले. घटना स्थळी ती स्वतःला सावरुन ती सासुचे घरी गेली सासु घरी नसल्यांनी ती तेथुन घरी रहमतनगर येथे आली रात्री पती कामावरुन आल्यानंतर झालेला प्रकार सांगितला तेंव्हा पतीने तक्रार देण्यास सांगितल्यांने हा प्रकार महिलेच्या छाती वर हात लावून धक्का देणे हा प्रकार लज्जा स्पद आहे. आरोपी सलीम यांच्या विरोधात तक्रार (FIR) कलम ३५४,५०६,५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे, सदर तपास अंमलदार ठाकरे यांच्या कडे आहे.