
मुंबई (प्रतिनिधी) दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी मुंबई मुख्य कार्यलय पंजाब नॅशनल बँक येथे एस. सी, एस. टी बहुजन एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन च्या राष्ट्रीय सल्लागार सतीश बोर्डे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला सतीश बोर्डे आणि कार्यध्यक्ष प्रमोद भालेराव, सचिव विनीत यादव यांनी पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर युनियनचे कार्यध्यक्ष प्रमोद भालेराव यांनी संघटना मध्ये सतीश बोर्डे यांचे महत्वाचे योगदान आहे तसेच एस. सी. एस. टी बहुजन एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन च्या कार्यलयासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली तसेच या संघटनेचे मार्गदर्शक नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते युनियचे कार्यलय उदघाट्न करण्यात आले हे त्यांनी आवर्जून सांगितले तसेच सतीश बोर्डे यांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी सतीश बोर्डे यांची पत्नी साक्षी सतीश बोर्डे त्यांची मैत्रीण इंदिरा, सोबत कामगार नेताचे कार्यकारी संपादक आर्यन (अभिषेक ) सिंह, शंकर आदी कार्यकर्ते आणि बँकेचे सहकारी उपस्थित होते.


