
वसई (प्रतिनिधी)- दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष वसई शहर मंडळचे नंदकुमार महाजन यांनी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय चे सह आयुक्त आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांना वसई मध्ये वाढते भेसळ युक्त पदार्थ विरुद्ध तक्रार अर्ज करण्यात आले आहे.
वसई प्रभाग समिती आय मध्ये रेस्टोरंट, हॉटेल, फरसाण, समोसे वडा विक्री करणारे लोक स्वच्छताची काळजी न घेता वारंवार उकळलेले तेल वापरून तयार केलेले चायनीज, वडा समोसे फरसाण या खाद्य प्रदूषित साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो,या दूषित खाद्य पदार्थची विक्री केली जाते त्यामुळे नागरिकांना विविध प्रकारचे आजार घसा खवखवणे उलटी होने तसेच रेस्टोरंट आणि हॉटेल यांचे मालक प्रथमतः किचन (स्वयंपाक खोली ) वॉशरूम प्रथमतः घाण असते पाण्याची टाकी वेळोवेळी साफ करत नाही, शिळे अन्न आणि फ्रिज मधले ठेवलेले अन्न दुसऱ्यादिवशी ग्राहकांना विक्री केली जाते त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी भाजपा वसई शहर मंडळ अध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी केली आहे.