शासनाच्या बैठकीमध्ये एका पत्रकाराच्या उपस्थितीची चर्चा ; पत्रकाराची वसुली?



प्रतिनिधी :पालघर जिल्ह्यातील वसई तालुका अंतर्गत पोमण ग्राम पंचायत हद्दीत हजारों अनधिकृत बांधकामे झाली असून सदर अनधिकृत बांधकामांना महसूल प्रशासनाचे संरक्षण लाभले आहे. पोमण येथील मधुरा हॉटेलच्या मागे अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून मजुराचा मृत्यू झाल्यानंतर सदर ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून २३ एप्रिल रोजी येथील बांधकामांवर कारवाईचा मुहूर्त तहसीलदार यांनी काढला आहे. प्रत्यक्षात कारवाई होते की मोठी तोडपाणी होते ते २३ एप्रिल रोजी कळेलच.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुका अंतर्गत पोमण ग्राम पंचायत हद्दीत हजारों अनधिकृत बांधकामे झाली असून सहाजिकच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणाशिवाय बांधकामे होऊच शकत नाहीत. प्रती चौरस फुटाप्रमाणे वसुली करण्यात आली असून भूमाफियांकडून करोडोची लाच जमा करून पैशांची वाटणी मंत्रालयापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळेच तर बिनधास्तपणे भूमाफिया अनधिकृत बांधकामे करीत आहेत.
पोमण येथील मधुरा हॉटेलच्या मागे एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता नानासाहेब कोळेकर यांनी तिरडी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वसईचे तहसीलदार यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीला तहसील कार्यालयातील अधिकारी, गट विकास अधिकारी, पोमण ग्राम पंचायतीचे ग्राम सेवक आदि उपस्थित होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या बैठकीला एक पत्रकार ही उपस्थित होता. शासकीय बैठकीमध्ये पत्रकाराची उपस्थिती कशी काय असू शकते? तहसीलदार यांनी या पत्रकाराला शासकीय बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी कशी काय दिली ? हा पत्रकार पोमण येथील अनधिकृत बांधकामांची दलाली करीत असल्याचे बोलले जाते. तहसीलदार व भूमाफिया यांच्यातील दुवा म्हणून हा पत्रकार काम करीत आहे पत्रकारांनी अवैध धंद्यांविरुद्ध आवाज उठवून त्या धंद्यांवर कारवाई होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. मात्र या ठिकाणी पत्रकार दलाली करताना दिसतात.
पोमण येथील अनधिकृत बांधकामांवर २३ एप्रिल रोजी कारवाईचा मुहूर्त तहसीलदार यांनी काढला असून कारवाई होते की तोडपाणी होते ते पहायचे आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *