
बहुजन महा पार्टी या पक्षातर्फे ठाणे लोकसभा क्षेत्रासाठी सलीमा मुख्तार वसानी, भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी दानीश एजाज अहमद शेख, मुंबई नॉर्थ सेंट्रल अब्बास खान, मुंबई नॉर्थ जुलफिकार आलम सय्यद यांनी बहुजन महा पार्टी या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे व निवडणुक आयोगाने प्रचारासाठी निवडणूक चिन्ह वाटप केले असल्याने वरील सर्व उमेदवाराने पूर्ण ताकदींनिशी प्रचारास सुरुवात केलेली आहे.याबाबत बहुजन महा पार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्या पक्षाचे उमेदवार नागपूर , अमरावती बीड व अन्य ठिकाणी देखील उभे राहिले होते त्यांनी देखील त्यांच्या शेत्रात चांगला प्रचार केला आहे. आता आम्ही मुंबई व ठाणे जिल्ह्यातील आमचे उमेदवार कसे विजयी होतील व त्यांचा प्रचार चांगल्या पद्धतीने करून त्यांना निवडून आणणे हा एकमेव आमचा उद्देश आहे या निवडणुकीत महागाई भ्रष्टाचार मुस्लिम समाजाला आरक्षण व सर्व विकासाच्या मुद्यावर बहुजन महा पार्टी निवडणूक लढणार आहे आम्ही दोन दिवसात आमच्या पक्षाचा जाहीर नामा प्रसिद्ध करणार आहोत असे शमसुद्दीन खान यांनी सांगितले आहे.