
विरार ता. (बातमीदार)
वसई विरार महानगरपालिकेचे सर्वात जुने रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या डी एम पेटिट रुग्णालयात पहिली मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेने पालिकेच्या रुग्णालयात हि आता मोठ्या आजारावरील शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पर्यंत पालिकेच्या रुग्णालयात चांगले उपचार मिळत नसल्याचा आरोप होत होता,.या शस्त्रक्रियेने पालिकेच्या मुकुटात एक सांधणाचे पीस खोवले गेले आहे.
महापालिकेचे सर्वत जुने रुग्णालय म्हणजे डी एम पेटिट रुग्णालय ओळखले जाते या ठिकाणी आता पर्यंत छोट्या मोठ्या आजारावर उपचार करण्यात येत होते. तसेच या रुग्णालयात जास्त करून बाळंत पानासाठी महिलांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर पहिल्यान्दाज रुग्णालयात मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्यात आली . पालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारीला लकवा मारला होता. त्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे झाले होते. त्यामुळे त्याच्यावर डॉ. निखिल चमणकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बसरूर,परिचारक सुनीता वर्तक,कॅरल ग्रासिस आणि अनिता वर्तक यांनी शस्त्रक्रिया केली हि शस्त्रक्रिया जवळपास साडेचार तास चालली . रुग्ण आता बरा झाला असून फिरू लागला आहे.