
पालघर – घरामध्ये रात्री झोपेत असताना मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले. त्यामध्ये घरातील चार जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी शेजाऱ्यांनी धाव घेतली. लगेच पोलीस आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले. ही घटना पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास पालघर-माहीम रोड येथील लक्ष्मी नारायण मंदिरासमोर घडली.
पालघरमध्ये मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले
नंदकिशोर चंद्रकांत विमावाला (वय 67) यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांना दम्याचा आजार आहे. तसेच त्यांच्या पत्नी कल्पना किशोर विमावाला (वय 62) यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मुलगा निपेश (वय 36) याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच दुसरा मुलगा जिगर (वय 34) हा किरकोळ जखमी झाला आहे.
