
जलसमाधी व रेल रोको आंदोलन छेडणार
पालघर,प्रतिनिधी,दि. जून
नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, हमारे गाव मे हमारा राज, एकच जिद्द वाढवण रद्द, हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा, भूमिपुत्रांचा एकजुटीचा विजय असो अश्या घोषणा देत केंद्र सरकारचा पुतळा जाळून वाढवण बंदराचा धिक्कार करत
वाढवण बंदर कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा एकच नारा वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीने दिला आहे. वाढवण गावातील भवानीमाता मंदिरात झालेल्या सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ही शपथ घेतली. हा संघर्ष आणखीन तीव्र करून पुढे जलसमाधी व रेल रोको आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.
केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदराच्या उभारणीसाठी मंजुरी दिल्यानंतर वाढवण व परिसरात जन आक्रोश उमटत आहे हे वाढवण बंदर समुद्रातच गाडून टाकू अशा घोषणाबाजी करत वाढवण गावामध्ये भवानी माता मंदिरात आज वाढवण बंदर विरोधी संघर्ष आणखीन तीव्र होताना दिसले.
केंद्र सरकारने वाढवण बंदरला मंजुरी दिली असली तरी लोकसभा निवडणुकीत त्यांनी येथील मते विकत घेतली मात्र त्यांना आंदोलने त्यांना विकत घेता येणार नाही. जी आंदोलने आमची झालेली आहे त्यापेक्षाही आता आमची आंदोलने आणखीन तीव्र होणार असा निर्धार वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीने केला असून यापुढे जलसमाधी आंदोलन व रेल रोको आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा मिलिंद राऊत यांनी दिला आहे.
हे सरकार अस संविधानिक असून ज्या सरकारचा ठराव अजूनही मंजूर झालेला नाही ते सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही किंवा कोणाला अंदाज नाही पहिल्याच कॅबिनेटमध्ये वाढवण बंदराला मंजुरी देऊन येथील नागरिकांच्या जखमांना मीठ चोळण्याचे काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. या सर्व बाबींचा आम्ही निषेध करत असून कोकण किनारपट्टी भागात ज्या पद्धतीने गैरकारभार व गैरप्रकार गैर मार्गाने करून निवडणूक लढवून तुम्ही खासदार की जिंकलात याचा अर्थ तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही विकत घेतला असा होत नाही यानंतरच्या कालखंडामध्ये कोकण किनारपट्टीचा भूमिपुत्र एकत्र एकत्रित येऊन या विनाशकारी प्रकल्प विरोधात लढा देणार आहे असा सभेमध्ये निर्धार करण्यात आला.
निवडणुकीमध्ये नागरिकांमधला जो काही निराशावाद आहे तो पुसून टाकला असून यापुढे पुन्हा मोठा आंदोलन उभे राहणार आहे या माध्यमातून सरकारला इशारा दिला जाणार आहे वाढवण बंदर निर्माण करण्यापेक्षा येथील जैवविविधता टिकवण्यासाठी मरीन पार्क तयार करा आमच्या येथे राग उचलायची आणि रांगोळ्या गुजरातला काढायच्या असे सरकारचे सुरू आहे आम्हाला अशाश्वत विकास नको असून आम्ही वाढवण बंदर फेटाळून लावणार अशी एकमताने मागणी करण्यात आली.यावेळी स्वप्नील तरे, भूषण भोईर, हेमंत तामोरे, शशी सोनावणे, भारत वायदा, नरेंद्र पाटील, नरेंद्र सुतारी, राजश्री भानाजी मरोल मुंबई, विजय वझे, प्रताप अकरे, किरण दळवी, हषध पाटील, शिवसेना शाखा प्रमुख उत्तेजण पाटील, शरद दळवी, ओसरवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील,वाढवणसह डहाणूखाडी व चिंचणी, वरोर, दिघरेपाडा येथील नागरिक उपस्थित होते.