ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे बीएफआय च्या साइट अँड साउंड मासिकानं २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट २५ चित्रपटांची निवड केली आहे. आणि या यादीत स्थान मिळवलंय काला सिनेमानं. बीएफआयचा दर्जा आणि मान अख्ख्या जगात आहे. त्यामुळे या यादीला विशेष महत्त्व आहे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या यादीत स्थान मिळवणारा काला हा एकमात्र भारतीय सिनेमा ठरलाय. कालासोबत “ओल्ड बॉय,” “गेट आउट,” आणि “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या सिनेमांची निवड देखील या यादीत करण्यात आली आहे.ही यादी ठरवताना बीएफआय ने जगभरातून बेस्ट असे २५ चित्रपट समीक्षक निवडले. त्या समीक्षकांनी सन २००० पासून ते सन २०२४ या पंचवीस वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षातील एक उत्कृष्ट चित्रपट निवडला आणि २०१८ सालात काला हा सिनेमा जगातल्या सर्व सिनेमांत सर्वोत्कृष्ट ठरला. यामुळं तमिळ सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळालाय. पण काही मोजके पोर्टल्स सोडले तर ही बातमी कुठेही नाही.पा. रंजीत त्याच्या चित्रपटांद्वारे आंबेडकरी अस्मितेची भाषा अधिक प्रखरपणे मांडण्याचं काम करत आलाय. शोषित-पिडीतांचे राजकीय हक्क आणि अधिकारांवर बोलण्यासाठी त्यांनी सिनेमासारख्या माध्यमाचा प्रभावी वापर केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *